Kalyani Nagar Accident sakal
पुणे

Kalyani Nagar Accident : कल्याणीनगरमध्ये मोटारीने दोघांना उडविणाऱ्या अल्पवयीन मुलाने अपघातापूर्वी…. कशी घडली घटना? जाणून घ्या घटनाक्रम

कल्याणीनगरमध्ये मोटारीने दोघांना उडविणाऱ्या अल्पवयीन मुलाने घटनेपूर्वी मद्यपान केले. त्यानंतर भरधाव मोटार चालवत धडक दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

कल्याणीनगरमध्ये मोटारीने दोघांना उडविणाऱ्या अल्पवयीन मुलाने घटनेपूर्वी मद्यपान केले. त्यानंतर भरधाव मोटार चालवत धडक दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

मोटारीने धडक दिलेल्या दुचाकीवरील दोघांनीही हेल्मेट परिधान केले नव्हते. त्यामुळे धडकेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. युवतीच्या डोक्यातून रक्तस्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणाला उपचारासाठी नेत असताना त्याने प्राण सोडला.

कशी घडली घटना? जाणून घ्या घटनाक्रम...

१८ मे रात्री ९.३० वाजता : अल्पवयीन आरोपी मित्रांसमवेत मुंढव्यातील कोझी हॉटेलमध्ये

१८ मे मध्यरात्री १२ पर्यंत : कोझी हॉटेलमध्ये पार्टी

१९ मे मध्यरात्री १२ नंतर : हॉटेल ब्लॅकमध्ये गेले

१९ मे मध्यरात्री एकपर्यंत : हॉटेल ब्लॅकमध्ये पार्टी

१९ मे पहाटे २.३० वा. : भरधाव आलिशान पोर्श मोटारीची दुचाकीस्वार आणि इतर दोन वाहनांना धडक

१९ मे सकाळी ८.१३ वा. : येरवडा पोलिसांकडून अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

१९ मे दुपारी चारच्या सुमारास : बाल न्याय मंडळाचे प्रमुख दंडाधिकारी आणि सदस्य डॉ. एल. एन. धनवडे व के. टी. थोरात यांच्याकडून आरोपीला अटी-शर्तींवर जामीन

२० मे १२.४८ वा. : मुलाचे वडिल व हॉटेल मालकांवर बाल न्याय अधिनियम २०१५च्या कलमांनुसार गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

बांगलादेशात मोठा राजकीय उलटफेर! राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; कार्यकाळ २०२८ पर्यंत असतानाही का पद सोडले?

Pune Metro Safety Nod: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला सुरक्षा मंजुरी; ‘माण–बालेवाडी’ टप्पा सुरू करण्याचा निर्णय आता सरकारच्या कोर्टात

Pune Tragedy: पुण्यातील भीषण अपघातात एमडी शिक्षण घेणाऱ्या डॉ. प्रशांत दासरवार यांचा मृत्यू

Pune Water Security: पुण्याच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी खडकवासला प्रकल्पातील धरणांतील गाळ काढण्यास संयुक्त समितीचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT