Kalyani Nagar Accident sakal
पुणे

Kalyani Nagar Accident : पुण्यातील वातावरण गरम; पोलिस प्रशासन मात्र थंड

कल्याणीनगरमधील अपघाताच्या घटनेनंतर मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर (ड्रंक अँड ड्राईव्ह) कारवाई करण्याबाबत पुणे पोलिस अजूनही ‘चिल्ड’ असल्याची स्थिती आहे.

सकाळ वृत्तसेवा

कल्याणीनगरमधील अपघाताच्या घटनेनंतर मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर (ड्रंक अँड ड्राईव्ह) कारवाई करण्याबाबत पुणे पोलिस अजूनही ‘चिल्ड’ असल्याची स्थिती आहे. मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतरही प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव आहे. पोलिसांची रात्र गस्त, वाहनचालकांची तपासणी, भरारी पथके अजूनही पुरेशी ‘ॲक्टिव्ह’ झालेली नाहीत. शहरातील काही भाग, प्रमुख रस्ते वगळता अन्य ठिकाणी अजूनही रस्त्यांवर पोलिसांचा वावर कमी असल्याचे ‘सकाळ’ने गुरुवारी रात्री केलेल्या पाहणीत आढळून आले.

कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, विमाननगरमध्ये पोलिसांकडून रात्री वाहनांची तपासणी केली जात आहे. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ करणाऱ्यांवर काही प्रमाणात कारवाईदेखील केली जात आहे. मात्र उर्वरित प्रमुख रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची तपासणी केली जात नसल्याची सद्यःस्थिती आहे.गणेशखिंड रस्ता, पुणे-मुंबई जुना महामार्ग, सेनापती बापट रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, सातारा रस्ता, बाजीराव रस्ता, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता, सोलापूर रस्ता, स्वारगेट परिसर, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, कोंढवा, कात्रज, लष्कर परिसर अशा बहुतांश भागात पोलिसांकडून रात्र गस्त, ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई होत नसल्याचे ‘सकाळ’ने गुरुवारी रात्री केलेल्या पाहणीत आढळून आले. डेक्कन, सारसबागसह अन्य भागांमधील चौपाटी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

काही भागांमध्ये पोलिसांकडून वाहने अडविली जात होती. वाहनचालकांची ब्रेथ अॅनलायझरद्वारे तपासणी केली जात होती. दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी स्मारक, कलमाडी हाऊसजवळ, कर्वे रस्ता अशा काही ठिकाणी पोलिसांच्या मोबाईल व्हॅन, नळ स्टॉप चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक अशा काही ठिकाणी पोलिस दुचाकीवरून गस्त घालत होते. अनेक रस्त्यांवर मद्यपी तरुण दुचाकीवर ट्रिपल सीट जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT