Kalyani Nagar Accident  sakal
पुणे

Kalyani Nagar Accident : आईलाही चौकशीसाठी पोलिस बोलावणार

अल्पवयीन आरोपीच्या घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यांऐवजी ते एका महिलेचे असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीच्या आईला चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अल्पवयीन आरोपीच्या घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यांऐवजी ते एका महिलेचे असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीच्या आईला चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

वैद्यकीय तपासणीवेळी घेतलेले रक्ताचे नमुने अल्पवयीन आरोपीचे नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर याच्यासह शिपाई अतुल घटकांबळे याला अटक केली होती.

या प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. हा अहवाल समोर आल्यानंतर आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर अल्पवयीन आरोपीची आई बाहेरगावी असल्याचे समजते. मात्र त्या त्यांच्या निकटवर्तीयांच्या संपर्कात आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डीएनए चाचणी होणार

ससूनमध्ये घेतलेल्या रक्ताचे नमुने अल्पवयीन आरोपीऐवजी एका महिलेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे नमुने नेमके कोणाचे आहेत, हे तपासण्यात येणार आहेत. डीएनए चाचणीतून ही बाब स्पष्ट होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT