vishal agarwal sakal
पुणे

Pune Accident : विशालसह सुरेंद्रकुमार अग्रवाल यांची पोलिसांकडून कसून चौकशी

कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यासाठी आणि मद्यपार्टीला परवानगी दिल्याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यासाठी आणि मद्यपार्टीला परवानगी दिल्याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून जाण्याचे कारण काय, अशी विचारणा केली. तसेच पोलिसांनी गुरुवारी (ता. २३) विशाल यांचे वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल, मोटारचालक आणि अपघाताच्या वेळी अल्पवयीन आरोपीच्या समवेत असलेल्या मित्राचीही चौकशी केली.

भरधाव मोटारीने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी विशाल अग्रवाल यांचा १७ वर्षीय मुलगा बालसुधारगृहात आहे, तर पोलिस कोठडीत असलेल्या विशाल अग्रवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ब्लॅक पबचा कर्मचारी नीतेश धनेश शेवानी (वय ३४, रा. एनआयबीएम) आणि जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) यांची पोलिसांनी आज कसून चौकशी केली.

मुलाला मद्यपार्टीची परवानगी का दिली?

अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यासाठी आणि मद्यपार्टीला परवानगी का दिली? गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून जाण्याचे प्रयोजन काय? असे प्रश्न विचारताच त्यांच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. त्यांचे वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनीही पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिली होती. त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पश्‍चात्ताप होतोय - सुरेंद्रकुमार अग्रवाल

सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पत्रकारांनी नातवाने केलेल्या अपघाताबाबत विचारले असता, या सर्व बाबींचा पश्चात्ताप होत असल्याचे त्यांनी सांगितले. छोटा राजनच्या मदतीने गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अजय भोसले यांनी केला होता. परंतु हे प्रकरण सीबीआयकडे असल्याने याबाबत आज कोणतीही चौकशी केलेली नाही. विशाल अग्रवाल यांना पळून जाण्यात मदत केली का आणि इतर मुद्द्यांवर चौकशी करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT