Video Viral sakal
पुणे

Pune Accident Viral Video : अल्पवयीन मुलाच्या आईची हात जोडून विनंती.. बनावट व्हायरल व्हिडिओचा उच्छाद

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीशी संबंधित कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीशी संबंधित कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला. बनावट व्हायरल व्हिडिओच्या उच्छादामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. मात्र, तो व्हिडिओ बनावट (फेक) असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

कल्याणीनगर अपघातात तरुण-तरुणीचा बळी गेल्याने शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात गुरुवारी अल्पवयीन आरोपीशी संबंधित रॅप साँग आणि शिवीगाळ करीत असल्याचे दोन कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाले. प्रसारमाध्यमांच्या हाती तो व्हिडिओ पडताच खळबळ उडाली.

दरम्यान, पोलिसांनी याबाबत बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्याकडेही विचारणा केली. त्यावेळी तो व्हिडिओ मुलाचा नसल्याचे सांगितले. तसेच, या व्हिडिओची खातरजमा केल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून तो व्हिडिओ बनावट असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या संदर्भात नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. असे फेक व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

अल्पवयीन तरुणाच्या आईचा खुलासा

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ त्यांच्या मुलाचा नसल्याचे अल्पवयीन मुलाच्या आईने स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ माझ्या मुलाचा नसून तो फेक व्हिडिओ आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT