Kamalnayan Bajaj Engineering College sakal
पुणे

NAAC : विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅक ए प्लस दर्जा प्राप्त

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट अँड अँक्रिडेशन कौन्सिलने (नॅक ) पुढील पाच वर्षांसाठी ए प्लस दर्जा बहाल केला आहे.

मिलिंद संगई,

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट अँड अँक्रिडेशन कौन्सिलने (नॅक ) पुढील पाच वर्षांसाठी ए प्लस दर्जा बहाल केला आहे.

बारामती - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट अँड अँक्रिडेशन कौन्सिलने (नॅक ) पुढील पाच वर्षांसाठी ए प्लस दर्जा बहाल केला आहे.

प्राचार्य डॉ. आर एस. बिचकर, उप-प्राचार्य सुधीर लांडे, डॉ. निर्मल साहूजी, समन्वयक डॉ. संताजी शिंदे यांनी ही माहिती दिली.

या समितीने मार्च महिन्यात दोन दिवस “राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदने” घालून दिलेल्या निकषानुसार शैक्षणिक प्रक्रियेत संस्थेची कामगिरी, अभ्यासक्रमाची निवड आणि अंमलबजावणी, शैक्षणिक दर्जा आणि मूल्यमापन, विद्यार्थ्यांचे निकाल, संशोधन कार्य आणि विद्याशाखा सदस्यांचे प्रकाशन, मूलभूत सुविधा आणि संसाधनांची स्थिती, प्रशासन, आर्थिक स्थिती, ग्रंथालय, प्रयोगशाळा, उपकरणे, संगणक या सारख्या विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या पायाभूत सेवा सुविधा, विविध क्षेत्रात महाविद्यालय कोणत्या पातळीवर आहे, तसेच महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग या सर्वाना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचे काटेकोर गुणात्मक क्षमतेने मूल्यांकन व मूल्यमापन केले.

सर्व निकषांचे योग्यरित्या परीक्षण करून “राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद” यांच्याकडून 21 फेब्रुवारी 2023 पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी A+ ग्रेड- 3.26 CGPA स्कोअर (सात पॉइंट स्केल) सह मान्यता दिली आहे.

संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, सचिव अॅड.निलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, किरण गुजर, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांनी प्राचार्य व सर्व टीमचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT