पुणे

कामठवाडीतील मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात

CD

वाल्हे, दि. २४ : पुरंदर तालुक्यातील कामठवाडी येथे श्री कानिफनाथ, श्री महादेव आणि श्री खंडोबा मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा बुधवारी (ता. २४) रिमझिम पावसाच्या साक्षीने आणि भक्तिमय वातावरणात झाला.
सकाळी सजविलेल्या वाहनातून श्रींच्या मूर्तींची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी कलश घेऊन आणि युवकांनी नृत्याद्वारे सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला. ग्रामस्थांनी घरोघरी गुढ्या उभारून आणि रांगोळ्या काढून मिरवणुकीचे स्वागत केले. कालिदास महाराज (मढी) यांच्या हस्ते मुख्य विधी आणि कलशारोहण पार पडले. पौरोहित्य सचिन, अभय आणि समीर देशपांडे यांनी केले.
पुणे-पंढरपूर पालखी मार्गालगत ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून हे मंदिर साकारण्यात आले आहे. या सोहळ्याला जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्यासह परिसरातील भाविक उपस्थित होते. धार्मिक विधींनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. समस्त कामठवाडी ग्रामस्थांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Earthquake : ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका पक्षात उभी फूट! १२ पैकी ८ आमदार भाजपच्या गोटात; विधानसभेतील समीकरणे बदलली!

Vidhan Bhavan Row : विधानभवनात व्हिजिटर पासेसवरून मोठा वाद! उपसभापती सचिन अहिर आणि उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या अधिकारांना कात्री

Latest Marathi News Live Update : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : महसूलमंत्री बावनकुळे

IND vs WI 5th T20I: ५-५ षटकांचा सामना? पावसाचा धुमाकूळ... किती वाजता टॉस, मॅचची वेळ... घ्या जाणून Cut off टाईम...

VIDEO : सरप्राइज देण्यासाठी अचानक घरी पोहोचली लेक; आईची प्रतिक्रिया पाहून नेटकरीही भावूक

SCROLL FOR NEXT