पुणे

अजित पवार यांचे नाव शेतकरी भवनाला देणार

CD

तळेगाव दाभाडे, ता. ८ : कामशेत येथील मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या प्रस्तावित शेतकरी भवनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याचा ठराव मासिक सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. संचालक गणेश विनोदे यांनी प्रस्ताव मांडला, तर ज्येष्ठ संचालक भरत येवले यांनी अनुमोदन दिले.
आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या सहकार्याने कामशेत येथील संस्थेच्या जागेवर सुमारे १५ कोटी रुपये खर्चून सुसज्ज शेतकरी भवन उभारण्याचा प्रस्ताव आहे. संस्थेने सहकार कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून खत व बियाणे विक्रीचा व्यवसाय पुन्हा सुरू केला असून, आगामी काळात पशुखाद्य व साखर विक्री केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सभापती किरण हुलावळे व उपसभापती सुनीता केदारी यांनी सांगितले.
यावेळी सभापती किरण हुलावळे, उपसभापती सुनीता केदारी, माजी सभापती शिवाजी असवले, संचालक एकनाथ येवले, गणेश विनोदे, माणिक गाडे, ज्ञानेश्वर निंबळे, शहाजी कडू, बाजीराव वाजे, रुपेश घोजगे, रमेश भुरुक, विष्णू घरदाळे, प्रमोद दळवी, मधुकर जगताप, मनीषा आंबेकर, आशा खांडभोर, विष्णू मुऱ्हे, विठ्ठल घारे आदी उपस्थित होते.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT