DHK26A05389
कान्हूर पठार ः येथील गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सन्मान करताना पतसंस्थेच्या अध्यक्ष सुशीला ठुबे. समवेत संचालक मंडळ व कार्यकारी संचालिका नमिता ठुबे.
कान्हूर पठार पतसंस्थेतर्फे
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
गुणवत्तेला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांसह पालकांचा गौरव
टाकळी ढोकेश्वर, ता. ६ ः कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील कान्हूर पठार पतसंस्थेतर्फे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्ष सुशीला ठुबे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
जनता विद्यामंदिर विद्यालयातील दहावीच्या तन्वी संपत शेळके, तनिष्का संतोष भागवत, स्वरांजली अर्जुन फापाळे तसेच बारावीच्या ऋतिका भाऊसाहेब सोनावळे, निकिता साहेबराव भागवत आणि स्नेहा राजू घुले या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सुशीला ठुबे, उपाध्यक्ष पी. के. ठुबे, संतोष ठुबे, सखाराम ठुबे, संजय ठुबे, कांतिलाल साळवे, द. मा. ठुबे, तुकाराम लोंढे, गोपाळ ठुबे, अशोक ठुबे, सहादू नवले, रंगनाथ फापाळे, संचालक पोपट झावरे, सुहास शेळके, गवराम गाडगे, मंगेश गांगरे, मधुकर साळवे, रामदास ठुबे, दादाभाऊ नवले, भगवान वाळूंज, राजेंद्र रोकडे, कार्यकारी संचालिका नमिता ठुबे, सचिन गाडगे, स्वप्नील सोमवंशी आदी उपस्थित होते.
----------
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान केल्याने त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा मिळते. संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या आर्थिक प्रगतीसोबतच त्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.
-नमिता ठुबे, कार्यकारी संचालिका, कान्हूर पठार पतसंस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.