पुणे

राज्यपालांची गरज नाही

CD

राज्यपालांची गरज नाही ः कनिमोळी

घटनात्मक प्रक्रियेबद्दल फेरविचार करण्याची अपेक्षा व्यक्त

चेन्नई, ता. ८ (पीटीआय) ः ‘‘राज्यपालपदाची कोणतीही आवश्‍यकता नाही, त्यामुळे हे पद रद्द करवे’’ ही आमची भूमिका अजूनही कायम आहे, असे मत द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. तमिळनाडूमध्ये सत्तास्थापनेवरून सुरू असलेल्या पेचप्रसंगावरून त्यांनी राज्यपाल पदाला असलेल्या विरोधाचा पुनरुच्चार केला आहे.
कनिमोळी म्हणाल्या, ‘‘आम्हाला राज्यपालांची अजिबात गरज नाही, ही आमच्या पक्षाची भूमिका कधीही बदलणारी नाही.’’ तसेच सध्याचा राज्यातील पेचप्रसंगाबाबतही कनिमोळी यांनी मतप्रदर्शन केले आहे. राज्यपालांकडून तमिळनाडूत सर्वांत मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्यास होत असलेल्या विलंबाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याचा जो पेचप्रसंग निर्माण झाला आहे, त्यातून , अनेक प्रश्‍न उपस्थित होत असून, घटनात्मक प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्‍यक असल्याचे कनिमोळी म्हणाल्या.
राज्यात कोणालाच पूर्ण बहुमत मिळाले नसल्याने सध्या पेचप्रसंग निर्माण झाले आहेत. मात्र, द्रमुक कोणत्याही परिस्थितीत अण्णाद्रमुक पक्षाला पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अशापद्धतीचे कोणतेही वृत्त हे भ्रामक आणि अफवाच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT