पुणे

कऱ्हाड महिलेचा गळा आवळून निर्घृण खून

CD

कऱ्हाडला महिलेचा
प्रियकराकडून खून

कऱ्हाड, ता. २१ ः चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा तिच्या प्रियकरानेच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना येथे घडली. खुनानंतर स्वतःच पोलिसात हजर राहून त्याची माहिती दिल्याने पोलिसांमध्येही खळबळ उडाली. खून झालेली पीडित महिला झोपेतच असताना हात व पायाने निर्घृणपणे गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमनजीकच्या झोपडपट्टी परिसरात पहाटे अडीच वाजता घटना घडली. कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी अडीचच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाला. संशयित सागर महादेव माने (वय ३२, रा. जुने मालखेड) असे खून करणाऱ्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित मृत महिला दहा वर्षांपासून पतीपासून वेगळी राहात होती. शहरातील विविध भागात रोजंदारीवर ती काम करत होती. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरात मुलासोबत राहते. बहिणीच्या ओळखीने त्या झोपडपट्टीत राहण्यास आली होती. संशयित मानेशी तिची ओळख झाली होती. ओळखीतून त्यांच्यात एक वर्षभरापासून संबंध निर्माण झाले होते. माने नेहमी त्यांच्या घरी येत-जात होता. काही दिवसांपासून सुषमाच्या चारित्र्यावर सागर संशय घेत होता. त्याच कारणावरून वारंवार मानसिक व शारीरिक छळ करत होता. कालही त्याच कारणावरून वाद झाला. पीडित महिलेचा मुलगा घरी नाही, याची माहिती मिळाल्यानंतर मानेने तिच्या घरात घुसून काटा काढला.
माने मध्यरात्री अडीचच्या सुमारास घरात शिरला. त्यावेळी संबंधित महिला झोपत होती. त्यावेळी त्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. दोन्ही हातांनी तिचा गळा आवळून पुन्हा गळ्यावर पाय देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ती बेशुद्ध झाली. त्यावेळी तिला तेथेच टाकून माने पोलिसात हजर झाला. त्याने प्रेयसीचा खून केल्याचे सांगून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी संबंधित महिला बेशुद्ध अवस्थेत निपचित पडली होती. पोलिस पोहोचल्यानंतर महिलेस रुग्णालयात दाखल केले. कृष्णा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना दुपारी तिचा मृत्यू झाला. तिच्या मुलाने फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDIA Bloc Vijay Chowk Protest: 'इंडिया' आघाडीचे नेते राष्ट्रपती भवनात; विजय चौकात खासदारांचे ठिय्या आंदोलन

MP OBC Reservation : मोठी बातमी! मध्य प्रदेशात 27 टक्के OBC आरक्षणाला उच्च न्यायालयाचा नकार; 14 टक्के आरक्षण कायम, रखडलेल्या 13 टक्के जागा भरण्याचेही निर्देश

CJPच्या आंदोलनापूर्वी गृह मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवी दिल्लीत ४ किमीच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! देशभरातील 23 राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; मॉन्सूनच्या परतीची सीमा कुठपर्यंत? महाराष्ट्रात वातावरण कसं?

Ab De Villier Hundred: ११ Six, ६ Fours! एबीच्या ४० चेंडूंत ११४ धावा; ऑस्ट्रेलियाला धुतले, २१० धावांचे लक्ष्य सहज पार केले, तोच जलवा...

SCROLL FOR NEXT