पान १४ साठी
करडई पिकाच्या विविध
वाणांची गुणवैशिष्ट्ये
--------------------
डॉ. कृष्णा अंभुरे
-----------------
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पिकांमध्ये करडईचा समावेश होतो. करडई हे कमी पाण्यात चांगले उत्पादन देणारे तसेच अवर्षणाचा ताण सहन करण्याची क्षमता असलेले पीक आहे. या पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे जमिनीच्या खालच्या थरातील ओलावा व अन्नद्रव्यांचा कार्यक्षमतेने उपयोग करून घेता येतो. तसेच पानांवर असलेल्या काट्यांमुळे पर्णोत्सर्जनाचे प्रमाण कमी राहते. त्यामुळे प्रतिकूल व दुष्काळी परिस्थितीतही करडई पीक तग धरून राहते.
यावर्षी ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामामुळे निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीत करडई हे कोरडवाहू क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त पीक ठरू शकते. कमी उत्पादन खर्चात समाधानकारक उत्पादन मिळत असल्याने करडईला कोरडवाहू शेतीत विशेष महत्त्व आहे. लागवडीसाठी सुधारित वाणांची निवड केल्यास करडईची उत्पादकता अपेक्षित मिळविणे शक्य आहे.
------------------
लागवडीसाठी वाण ः
परभणी १२ (परभणी कुसुम) ः
- प्रसारण वर्ष ः २००२
- पीक कालावधी ः १३० ते १३५ दिवस.
वैशिष्ट्ये ः
- बागायती, जिरायती लागवडीसाठी योग्य
- मर रोग व मावा किडीस प्रतिकारक्षम
- खत व पाणी यांना चांगला प्रतिसाद देणारा
- तेलाचे प्रमाण २९ टक्के.
- उत्पादकता (हेक्टरी) ः
अ) कोरडवाहू क्षेत्र १० ते १२ क्विंटल
ब) बागायती २० ते २२ क्विंटल.
-----------------
परभणी ४० ः
- प्रसारण वर्ष ः २००७
- पीक कालावधी ः ११८ ते १२८ दिवस.
वैशिष्ट्ये ः
- निम काटेरी वाण.
- जिरायती, बागायती क्षेत्रासाठी योग्य.
- फुलोऱ्यात येण्याचा कालावधी ७७ ते ८५ दिवस
- मर रोग व मावा किडीस सहनशील.
- खत व पाणी यांना चांगला प्रतिसाद देणारा.
- उत्पादकता (हेक्टरी) :
अ) जिरायती क्षेत्र : ७ ते ८ क्विंटल
ब) बागायती : १४ ते १५ क्विंटल.
------------
परभणी ८६ (पूर्णा) ः
- प्रसारण वर्ष ः २०१५
- पीक कालावधी ः १३० ते १३२ दिवस.
वैशिष्ट्ये ः
- जिरायती आणि बागायती क्षेत्रासाठी योग्य
- फुलोऱ्यात येण्याचा कालावधी ः ९० ते ९३ दिवस
- मर रोग (उबळ) आणि मावा किडीस प्रतिकारक्षम
- पानांवरील ठिपके रोगास सहनशील
- तेलाचे प्रमाण ३० टक्के.
उत्पादकता (हेक्टरी) ः
अ) जिरायती क्षेत्र : १० ते १२ क्विटंल
ब) बागायती क्षेत्र : १८ ते २० क्विंटल.
------------
परभणी १८४ (पीबीएनएस १८४) ः
- प्रसारण वर्ष ः २०२५
- पीक कालावधी ः १२० ते १२४ दिवस.
वैशिष्ट्ये ः
- जिरायती, बागायती लागवडीस योग्य
- फुलोऱ्यात येण्याचा कालावधी ७८ ते ८१ दिवस
- पानांवरील ठिपके, मर रोग आणि मावा किडीस सहनशील
- तेलाचे प्रमाण ३१.३ टक्के.
उत्पादकता (हेक्टरी) ः
अ) जिरायती क्षेत्र : १२ ते १५ क्विंटल.
ब) बागायती क्षेत्र : १८ ते २० क्विंटल.
------------
पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) ः
- प्रसारण वर्ष २०२२
- पीक कालावधी ः जिरायती क्षेत्रात १२४ ते १२६ दिवस तर बागायती १३४ ते १३६ दिवस.
वैशिष्ट्ये ः
- जिरायती तसेच बागायती क्षेत्रासाठी योग्य
- मर रोग आणि मावा किडीस मध्यम प्रतिकारक
- तेलाचे प्रमाण ३०.९ टक्के.
उत्पादकता (हेक्टरी) ः
अ) जिरायती क्षेत्र : १० ते १२ क्विंटल.
ब) बागायती क्षेत्र : १५ ते १७ क्विंटल.
------------
भीमा ः
- प्रसारण वर्ष - १९८२
- पीक कालावधी ः १३० ते १३५ दिवस
वैशिष्ट्ये ः
- कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस
- अवर्षणास प्रतिकारक
- मावा किडीस मध्यम प्रतिकारक, मर रोगास मध्यम प्रतिकारक
- तेलाचे प्रमाण २९ ते ३० टक्के
- फुलांचा रंग उमलताना पांढरा, वाळल्यानंतर फिक्कट पांढरा व मध्यभागी लालसर ठिपका.
- उत्पादकता ः हेक्टरी १३ ते १५ क्विंटल
------------
फुले कुसुमा ः
- प्रसारण वर्ष २००३
- पीक कालावधी १३५ ते १४० दिवस
वैशिष्ट्ये ः
- कोरडवाहू तसेच संरक्षित पाण्याखाली लागवडीस योग्य
- मावा किडीस मध्यम प्रतिकारक
- फुलांचा रंग उमलताना पिवळा, वाळल्यानंतर लाल
- तेलाचे प्रमाण ३० टक्के
- उत्पादकता (हेक्टरी) ः
अ) जिरायती क्षेत्र : १३ ते १५ क्विंटल.
ब) बागायती क्षेत्र : २० ते २२ क्विंटल.
------------
एस.एस.एफ. ७०८ ः
- प्रसारण वर्ष २०१०
- पीक कालावधी ११५ ते १२० दिवस
वैशिष्ट्ये ः
- पश्चिम महाराष्ट्रासाठी, कोरडवाहू तसेच बागायती लागवडीस योग्य
- मावा किडीस मध्यम प्रतिकारक
- फुलांचा रंग उमलताना पिवळा, वाळल्यानंतर लाल
- तेलाचे प्रमाण ३१ टक्के
- उत्पादकता (हेक्टरी) ः
अ) जिरायती क्षेत्र : १३ ते १५ क्विंटल.
ब) बागायती क्षेत्र : २० ते २२ क्विंटल.
------------
फुले करडई (एस. एस. एफ. ७३३) ः
- प्रसारण वर्ष २०११
- पीक कालावधी १२० ते १२५ दिवस
वैशिष्ट्ये ः
- कोरडवाहू लागवडीसाठी योग्य
- मावा किडीस मध्यम प्रतिकारक
- तेलाचे प्रमाण २९ टक्के
- फुलाचा रंग उमलताना पांढरा, वाळल्यानंतर फिक्कट पांढरा
- झाडांची उंची मध्यम
- उत्पादकता (हेक्टरी) ः कोरडवाहू १३ ते १५ क्विंटल
------------
एस. एस. एफ. ७४८ (फुले चंद्रभागा) ः
- प्रसारण वर्ष २०१२
- पिकाचा कालावधी १३० ते १४० दिवस
वैशिष्ट्ये ः
- कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी योग्य
- तेलाचे प्रमाण २९ टक्के
- मावा किडीस मध्यम प्रतिकारक
- फुले उमलताना पिवळी, वाळल्यानंतर लाल रंगाची.
- उत्पादकता (हेक्टरी) ः
अ) जिरायती क्षेत्र : १३ ते १५ क्विंटल.
ब) बागायती क्षेत्र : २० ते २२ क्विंटल.
------------
फुले नीरा (एस.एस.एफ. १२-४०) ः
- प्रसारण वर्ष २०२०
- पिकाचा कालावधी १२० ते १२५ दिवस
- वैशिष्ट्ये ः
- अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी शिफारस
- मावा किडीस व मर रोगास मध्यम प्रतिकारक
- तेलाचे प्रमाण ३२.९ टक्के
- उत्पादकता (हेक्टरी) ः
अ) जिरायती क्षेत्र : १३ ते १५ क्विंटल.
ब) बागायती क्षेत्र : २० ते २२ क्विंटल.
------------
फुले गोल्ड (एस.एस.एफ. १५-६५) ः
- प्रसारण वर्ष २०२१
- पिकाचा कालावधी १२० ते १२५ दिवस
वैशिष्ट्ये ः
- अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी शिफारस
- सर्वाधिक तेलाचे प्रमाण ३४.६ टक्के
- मर रोगास मध्यम प्रतिकारक
- उत्पादकता (हेक्टरी) ः
अ) जिरायती क्षेत्र : १४ ते १६ क्विंटल.
ब) बागायती क्षेत्र : २० ते २२ क्विंटल.
------------
फुले किरण (एस.एस.एफ. १६-०२) ः
- प्रसारण वर्ष २०२१
- पिकाचा कालावधी ः १२५ ते १३० दिवस
वैशिष्ट्ये ः
- अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी शिफारस
- तेलाचे प्रमाण ३०.५ टक्के
- मावा किडीस मध्यम प्रतिकारक
- उत्पादकता (हेक्टरी) ः
अ) जिरायती क्षेत्र : २० ते २५ क्विंटल.
ब) बागायती क्षेत्र : २४ ते २५ क्विंटल.
------------
अकोला पिंक ः
- पिकाचा कालावधी ः १३० ते १३५ दिवस
वैशिष्ट्ये ः
- बिन काटेरी वाण
- विदर्भात लागवडीसाठी प्रसारित
- उत्पादकता (हेक्टरी) ः १२ ते १५ क्विंटल
------------
एस.एस.एफ. ६५८ ः
- प्रसारण वर्ष २००८
- पिकाचा कालावधी ः ११५ ते १२० दिवस
वैशिष्ट्ये ः
- बिन काटेरी वाण
- अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस
- मावा कीड व मर रोगास मध्यम प्रतिकारक
- तेलाचे प्रमाण २८ टक्के
- फुलांचा रंग उमलताना पिवळा व वाळल्यानंतर विटकरी लाल.
- उत्पादकता (हेक्टरी) ः १२ ते १३ क्विंटल
------------
नारी ६ ः
- प्रसारण वर्ष २०००
- पिकाचा कालावधी ः १३० ते १३५ दिवस
वैशिष्ट्ये ः
- बिन काटेरी वाण
- पाकळ्या गोळा करण्यास योग्य.
- उत्पादकता (हेक्टरी) ः १० ते १२ क्विंटल
------------
नारी एन एच १ (संकरित वाण) ः
- प्रसारण वर्ष २००१
- पिकाचा कालावधी ः १३० ते १३५ दिवस
वैशिष्ट्ये ः
- बिन काटेरी वाण
- पाकळ्या गोळा करण्यास योग्य
- उत्पादकता (हेक्टरी) ः १२ ते १४ क्विंटल
----------------
डॉ. कृष्णा अंभुरे, ८८३०७५०३९८
(विषय विशेषज्ञ, संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.