KRK26B04081
करकंब (ता. पंढरपूर) : करकंब फेस्टिव्हलच्या सांगता समारंभाप्रसंगी दत्तात्रय खंदारे यांना करकंब भूषण पुरस्कार प्रदान करताना सिने कलावंत अजय तपकिरे व इतर.
---
करकंबचा सांस्कृतिक वारसा जपायला हवा
अजय तपकिरे; दत्तात्रय खंदारे यांना ‘करकंब भूषण’ पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
करकंब, ता. १६ : करकंबच्या भूमीला आणि मातीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या वारशाचा सुगंध असाच दरवळत राहावा. येथील समृद्ध सांस्कृतिक परंपरा करकंब फेस्टिव्हलच्या माध्यमातून जपली जात आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार सिनेअभिनेते अजय तपकिरे यांनी काढले.
करकंब येथे चार दिवस चाललेल्या करकंब फेस्टिव्हलच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी मानाचा समजला जाणारा ‘करकंब भूषण’ पुरस्कार दत्तात्रय खंदारे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी गीतांजली दुधाणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अमृता देशमुख, पोलिस उपनिरीक्षक वैभव शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक अनंत व्यवहारे, फेस्टिव्हलचे अध्यक्ष लक्ष्मण जाधव, उपाध्यक्ष सचिन शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
फेस्टिव्हलचे अध्यक्ष जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर अजितसिंह देशमुख यांनी आभार मानले. फेस्टिव्हल यशस्वी करण्यासाठी सचिन शिंदे, शिवराज पंडित, संतोष पिंपळे, संतोष शेटे, दत्ता कदम, दत्तात्रय खंदारे, नितीन खाडे, जयंत सोमण, अजितसिंह देशमुख आदींनी परिश्रम घेतले.
---
कोण काय म्हणाले?
- अमृता देशमुख (प्रादेशिक परिवहन अधिकारी) : शालेय जीवनात करकंब फेस्टिव्हलसारखे व्यासपीठ मिळाल्यामुळेच आम्ही घडलो. आमच्यासाठी फेस्टिव्हल हीच खरी दिवाळी होती. या माध्यमातून अनेकांच्या कलागुणांना वाव मिळाला. स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे.
- गीतांजली दुधाणे (उपविभागीय पोलिस अधिकारी) : आम्हीही करकंब फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत असू. बक्षिसांपेक्षा सहभाग महत्त्वाचा असून, त्यातून आत्मविश्वास निर्माण होतो. हा फेस्टिव्हल कायम सुरू राहावा.
- वैभव शिंदे व अनंत व्यवहारे : करकंबच्या सुपुत्रांचा यथोचित सन्मान होत असल्याने वेगळाच आनंद मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.