पुणे

ज्येष्ठ महिलेच्या खूनप्रकरणी नातेवाईकाला अटक

CD

चाकण, ता. १० : करंजविहिरे (ता. खेड) येथील ८० वर्षीय महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या आरोपीला महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. कैलास कुंडलिक मरगज (वय ३६) असे आरोपीचे नाव असून, त्याने सिंधूबाई मरगज यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ मे रोजी रात्री आठच्या सुमारास मरगज वस्ती येथे घडली. आरोपी कैलास याने त्याच्या भावकीतील सिंधूबाई मरगज यांचे २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले आणि त्यांचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह करंजविहिरे-धामणे मार्गावरील भामा नदीच्या पात्रात फेकून दिला.
याप्रकरणी समीर मरगज यांनी महाळुंगे उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गॅस सिलिंडरच्या बहाण्याने तरुणीला शेतात नेलं; सामूहिक अत्याचारानंतर अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, दोघांना अटक

Career Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांना कोणत्याही कामात येतात शंभर अडथळे, पण जिद्दीने पूर्ण करतात सगळी स्वप्नं

Latest Marathi News Live Update: पुण्यात भरधाव कारचा भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटून डिव्हायडरला जोरदार धडक

Mumbai: रेल्वे स्थानकांवर थुंकणाऱ्यांचा सुळसुळाट! २,६५७ प्रवाशांवर कारवाईचा बडगा, ५ लाखांची वसुली

Vijay Thalapathy: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विजय थलापती यांच्या मोठ्या घोषणा; 'या' फाईलवर केली पहिली सही

SCROLL FOR NEXT