विजेच्या तारांना
फांद्याचा धोका
कऱ्हाड ः शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वाढल्या आहेत. त्या प्रवाहित वीज तारेतून फांद्या गेल्या आहेत. त्यामुळे विजेचा धक्का बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्याने प्रवाहित विजेची तार आणि झाड्यांच्या फांद्यामध्ये घर्षण होऊन दुर्घटना घडण्याचाही शक्यता नाकारता येत नाही. महावितरणने त्याची दखल घेऊन तातडीने झाडांच्या फांद्या तोडाव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
...................