उपजिल्हा रुग्णालयासाठी साडेचार कोटी द्या
आमदार डॉ. भोसले; आरोग्यमंत्र्यांकडे केली निधीची मागणी
कऱ्हाड, ता. ८ ः येथील (स्व.) सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरणासाठी शासनाने साडेचार कोटींचा निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केली. मुंबई येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले.
येथील उपजिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, रुग्णालयाची मुख्य इमारत आवारातील इतर इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड व झीज झाली आहे. इमारतीच्या दुरवस्थेमुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती होते. भिंतींना तडे गेले आहेत. जुने विद्युत व प्लंबिंगचे जाळे आणि स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्थेमुळे रुग्ण, डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यावेळी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, तातडीची दुरुस्ती, वॉटरप्रूफिंग, सिव्हिल व इलेक्ट्रिकल नूतनीकरण करणे गरजेचे आहे. या कामांसाठी शासनाकडून साडेचार कोटींचा निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी आमदार डॉ. भोसले यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली. रुग्णालयाच्या इमारतीची सुरक्षितता आणि तेथील आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी या कामांना प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केली.
यावेळी मंत्री आबिटकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन, निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
...........
कोट
..............
(स्व.) सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयावर शहरासह ग्रामीण, डोंगरी भागातील नागरिक अवलंबून आहेत. त्यामुळे या रुग्णालय इमारतीच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी निधी मिळावा, यासाठी आरोग्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. लवकरच हा प्रश्न मार्गी लागून रुग्णांना अधिक सुरक्षित व चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होईल.
- डॉ. अतुल भोसले, आमदार
W48153
मुंबई : कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाबाबत प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा करताना डॉ. अतुल भोसले.
.........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.