पुणे

कऱ्हाड शहरातीलखड्डास्वतःबुजवला

CD

‘हॉकर्स’च्या पदाधिकाऱ्यांनी बुजवले खड्डे

कऱ्हाडला पालिकेच्या दुर्लक्षपणामुळे घेतला पुढाकार

कऱ्हाड, ता. १७ ः शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाच्या पाठीमागील बाजूच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यासंदर्भात पालिकेसह नगरसेवकांना कळवूनही ते खड्डे बुजवले गेले नाहीत. त्यामुळे हॉकर्स संघटनेचे जावेद नायकवडी व सहकाऱ्यांनी सिमेंटवर व खडी टाकून तो रस्ता बुजवला. त्यांच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनामागील बाजूकडून पोस्टाकडे येणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यासंदर्भात पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांना कळवले होते. त्याचबरोबर नगरसेवकांनाही कळवले होते. मात्र, त्यानंतरही त्या रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले नसल्याचे श्री. नायकवडी यांनी सांगितले. पालिकेचे त्या खड्ड्यांकडे दुर्लक्षच झाल्यामुळे वाहनधारक, नागरिकांची गैरसोय होत होती. त्याचा विचार करून श्री. नायकवडी व त्यांचे सहकारी सलीम पटेल, कृष्णा रणदिवे, श्रीधर मुळे, बबलू इनामदार यांनी संबंधित खड्डा स्वतः सिमेंट, खडी टाकून बुजवला. त्यामुळे वाहनधारकांची सोय झाली. त्यांच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

W19764
कऱ्हाड ः रस्त्यावरील खड्डा स्वतः सिमेंट, खडी टाकून बुजवताना जावेद नायकवडी व सहकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT