पुणे

कऱ्हाडच्या बाजारपेठेत अतिक्रमणांचा विळखा

CD

अतिक्रमणांचा विळखा, पार्किंगचा ठणठणाट

कऱ्हाड पालिकेचे दुर्लक्ष; अरुंद रस्ते, बेशिस्त पार्किंग आणि विक्रेत्यांची गर्दी

कऱ्हाड, ता. २ ः येथील मुख्य बाजारपेठेत ऐन सणासुदीत गर्दी होऊ लागली आहे. शहरातील प्रमुख रस्ते अन् मुख्य चौकांत किरकोळ विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे ग्राहक आणि वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. पालिका आणि शहर पोलिस याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. वाहतूक शाखेचे पोलिस किमान त्या समस्येकडे फिरून लक्ष ठेवून आहेत. मात्र, पालिकेचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याने ऐन गर्दीच्या काळात शिस्त लावायची तरी कोणी? अशी संतापजनक स्थिती निर्माण झाली आहे.

दीपावलीच्या खरेदीसाठी दत्त चौक ते आझाद चौक तेथून चावडी चौक, भाजी मंडई आणि शहरांतर्गत शुक्रवार व गुरुवार पेठेचा परिसर या मध्यवर्ती भागात गर्दी वाढली आहे. त्या परिसरात रस्त्यांच्या दुतर्फा बसणारे हातगाडे आणि किरकोळ विक्रेत्यांमुळे रस्त्यांचा आकार अत्यंत अरुंद झाला आहे. परिणामी, मालवाहू आणि मोठी वाहने बाजारपेठेत आली, की तासन्‌तास वाहतूक ठप्प होत आहे.

शहरात आधीच अतिक्रमणांमुळे आकसलेले रस्ते आणि त्यात रस्त्यावर होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे दररोज वाहतुकीचा पुरता फटका बसत आहे. सणासुदीच्या काळात ही समस्या अधिक बिकट होण्याची चिन्हे आहेत. बाजारपेठेतील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणे हटवण्यासाठी पालिकेची अतिक्रमणविरोधी तुकडी केवळ नावालाच उरल्याची टीका होत आहे. पोलिसांकडूनही वाहतूक नियमनासाठी ठोस कारवाई होताना दिसत नाही. किरकोळ विक्रेत्यांवर कायमस्वरूपी कारवाई न करता केवळ तात्पुरते रस्ते रिकामे केले जातात आणि पथक जाताच परिस्थिती पूर्ववत होते. पालिका व पोलिसांच्या या कचखाऊ धोरणामुळे अतिक्रमकांचे धाडस वाढले असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.


चौकट

मोठ्या वाहनांचे नियोजन

सणासुदीची गर्दी लक्षात घेता पोलिस व पालिकेने तातडीने विशेष मोहीम राबवून मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे कमी करावीत. शहरात मोकळ्या जागावर पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात चारचाकी वाहनांसाठी व्यवस्था करावी. बाजारपेठेत मोठ्या वाहनांच्या प्रवेशासाठी वेळेचे नियोजन करावे, अशी मागणी कऱ्हाडकरांकडून होत आहे.


63310
कऱ्हाड ः सणासुदीच्या काळात किरकोळ विक्रेत्यांसह व्यापाऱ्यांच्या वाढत्या अतिक्रमणांमुळे शहरात कोंडी वाढते आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ती सध्या डोकेदुखी ठरली आहे.


सचिन शिंदे...12:53 01-11-2026

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Court Bomb Threat Today : सातारा जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ई-मेलमुळे उडाली खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Virat Kohli Records: न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहली रचणार इतिहास? तीन मोठे विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी; कोणते आहेत रेकॉर्ड्स?

नेतान्याहूंचा ट्रम्प यांच्यावर दबाव, सात दिवसांत इराणवर अण्वस्त्र हल्ला! अमेरिकेतील वरिष्ठ पत्रकाराचा मोठा दावा, जगभरात खळबळ...

Latest Marathi News Live Update : राम मंदिरातील देणग्यांच्या कथित चोरीप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Mumbai Food Poisoning: लग्नाच्या जेवणातून ७०-१०० जणांना विषबाधा, वधू-वरासह वऱ्हाडी रुग्णालयात दाखल; मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT