पुणे

कऱ्हाड प्रांताधिकारीम्हेत्रेप्रेस

CD

मतदारांच्या घरूनच अर्ज घेणार भरून

प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे; कऱ्हाडला सहकार्य करण्याचे आवाहन

कऱ्हाड, ता. २६ ः मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे प्रत्येक मतदाराच्या घरी जाणार आहेत. त्यांच्याकडून अर्ज भरून घेऊन त्याची पोहोच घेतली जाणार आहे. त्यासाठी ३० जून ते २९ जुलैदरम्यान ही मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले.
मतदान यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, सहाय्यक मतदान केंद्र अधिकारी यांचे प्रशिक्षण येथे घेण्यात आले. त्यावेळी प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी ही माहिती दिली. उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार कल्पना ढवळे, शुभदा शिंदे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, मलकापूरचे मुख्याधिकारी कपिल जगताप, रहिमतपूरचे मुख्याधिकारी विशाल भोसले, निवासी नायब तहसीलदार बाबूराव राठोड, नायब तहसीलदार महेश उभारे, बालविकास प्रकल्प अधिकारी विभूते उपस्थित होते.
प्रांताधिकारी श्री. म्हेत्रे म्हणाले, ‘‘केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. पाच ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्या यादीवर पाच ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान हरकती घेता येतील. तीन ऑक्टोबरपर्यंत हरकती निकाली काढण्यात येतील आणि सात ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.’’
दरम्यान, एक ऑक्टोबर २०२६ रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण असेल त्यांना मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार आहे. संबंधितांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून नावे मतदार यादीत समाविष्ट करावी, असेही श्री. म्हेत्रे यांनी सांगितले.
-----------------------
29966
कऱ्हाड ः मतदार यादीसंदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना अतुल म्हेत्रे. समोर उपस्थित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी.
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT