कऱ्हाडमध्ये काविळीचे वाढले रुग्ण
नागरिकांसमोर आरोग्याचे संकट; कृष्णा- कोयनेचे पाणी अडवल्याने वासासह चवही बदलली
कऱ्हाड, ता. १४ ः दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी कृष्णा नदीवर टेंभू येथे उपसा सिंचन योजना उभारली आहे. त्यासाठी कृष्णा-कोयना नद्यांचे पाणी अडवण्यात आले आहे. २० दिवसांहून अधिक दिवस पाणी अडवल्याने प्रवाह थांबला आहे. त्यामुळे पाण्यात शेवाळ वाढले असून, पाण्याला वासही येऊन चवही बदलली आहे. नागरीकांना तेच पाणी प्यावे लागत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात काविळीचेही रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
कऱ्हाड शहरासह परिसरातील अनेक गावांचा पाणीपुरवठा कृष्णा नदीवर अवलंबून आहे. सध्या नदीपात्र प्रवाही नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे शेवाळ, जलवनस्पती आणि गाळ वाढत आहे. पाण्याला दुर्गंधी येऊ लागली असून, नागरिकांना तेच पाणी पिण्यास वापरावे लागत आहे. काही भागांत नळाद्वारे येणाऱ्या पाण्याला वेगळी चव येत आहे. दरम्यान, शहरात काविळीचेही रुग्ण वाढू लागले आहेत. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, त्वचारोग तसेच इतर संसर्गजन्य आजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
..................
शेवाळ आरोग्यासाठी धोकादायक
नदी, तलाव किंवा धरणातील पाण्याचा प्रवाह दीर्घकाळ थांबल्यास त्या पाण्यात शेवाळ वाढण्याचे प्रमाण वाढते. विशेषतः उन्हाळ्यात तापमान वाढल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि जलवनस्पती वेगाने वाढतात. त्यामुळे पाण्याचा रंग, वास आणि चव बदलू शकते. अशा पाण्यात जिवाणू आणि सूक्ष्मजंतू वाढण्याची शक्यता अधिक असते.
........................
तातडीने उपाययोजनेची गरज
प्रशासनाने तातडीने कृष्णा नदीचे अडवलेले पाणी सोडून देऊन धरणातून नदीपात्रात प्रवाही पाणी सोडण्याची गरज आहे. अजूनही काही दिवस हेच पाणी राहिल्यास नागरिकांत आरोग्याचे संकट ओढवणार असल्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्याचबरोबर पालिका आणि आरोग्य विभागाने पाण्याची नियमित तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षाही नागरिकांतून व्यक्त होत आहे.
PNE26W19014
कऱ्हाड ः टेंभू योजनेसाठी कोयना-कृष्णा नदीचे पाणी अनेक दिवस अडवल्याने ते हिरवे पडून चवही बदलली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.