पुणे

कारहुणवी हा कृतज्ञतेचा सण, बैलांना त्रास देण्याचा नव्हे

CD

कारहुणवी हा कृतज्ञतेचा सण, बैलांना त्रास देण्याचा नव्हे
बैलांची शिंगे तासू नका, रासायनिक रंग टाळा : ॲनिमल राहत संस्थेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २६ : शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा कारहुणवी हा सण पारंपरिक उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या उत्सवादरम्यान बैलांना आकर्षक दिसण्यासाठी त्यांची शिंगे तासणे, शरीरावर रासायनिक रंग लावणे, तसेच डीजेच्या कर्णकर्कश आवाजात तासन्‌तास उभे ठेवणे अशा प्रकारांमुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कारहुणवी साजरी करताना बैलांचा सन्मान राखत त्यांना कोणताही शारीरिक किंवा मानसिक त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन ॲनिमल राहत संस्थेने केले आहे.
अलीकडील काळात बैलांच्या सजावटीसाठी रासायनिक रंगांचा वापर, शिंगे तासणे आणि मोठ्या आवाजातील मिरवणुकांमध्ये त्यांचा सहभाग वाढल्याने अनेक जनावरांना डोळे, त्वचा आणि शिंगांशी संबंधित आजारांचा सामना करावा लागत आहे. डोळ्यांतून सतत पाणी येणे, त्वचेचे विकार तसेच शिंगांवरील जखमा यांसारख्या समस्या उद्‌भवू शकतात, असे संस्थेने नमूद केले आहे. शिंगे तासण्याऐवजी रंगीत रिबिनींचा वापर करा. रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक फुले वापरून सजावट करावी. डीजेच्या मोठ्या आवाजापासून बैलांना दूर ठेवा. त्यांना जबरदस्तीने नाचवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शांत वातावरणात उत्सव साजरा करून बैलांना पुरेसा आराम, चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे. वेसणऐवजी म्होरकीचा वापर करावा, दोन दाव्यांऐवजी एकच दाव वापरावा आणि बैलांसह इतर जनावरांना नियमित खरारा करावा, असेही संस्थेने सुचविले आहे.
---
कोट
PNE26W29651
संस्थेतर्फे सोलापूर व पंढरपूर परिसरात जनावरांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी शेतकऱ्यांना बैलांची तपासणी व मोफत उपचाराची सुविधाही उपलब्ध आहे. कारहुणवी हा सण बैलांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या परिश्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. हा दिवस त्यांना वेदना देण्याचा नव्हे. त्यामुळे प्रत्येक बैलमालकाने हा सण संवेदनशीलतेने साजरा करून जनावरांच्या कल्याणाला प्राधान्य द्यावे.
- डॉ. आकाश जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी, ॲनिमल राहत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT