पुणे

करमाळ्यात मोहरम उत्साहात साजरा; सामाजिक सलोख्याचा संदेश

CD

KOR26B10870
करमाळा : मोहरमनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी व अन्य.

करमाळ्यात सामाजिक सलोख्याचे दर्शन
सवारींच्या मिरवणुका, फळवाटप

करमाळा, ता. २६ : करमाळा शहरात मोहरम उत्सव मोठ्या उत्साहात आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागांत पंजाच्या सवारींची स्थापना करण्यात आली होती. मोहीद्दीन तालीम, कुरेशी गल्ली, मौलालीनगर, खाटीक गल्ली, कुंभारवाड्यातील अल्लाउद्दीन साहेब सवारी तसेच भुईकोट किल्ला परिसरातील मानाची नालसाहेब सवारी यामध्ये प्रमुख होत्या.

उत्सवानिमित्त विविध सवारींच्या सवाद्य मिरवणुका शहरातून काढण्यात आल्या. नालसाहेब सवारीचे शहरभर फुलांची चादर अर्पण करून तसेच रेवडीचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या अल्लाउद्दीन साहेब सवारीचीही मिरवणूक उत्साहात पार पडली. सायंकाळी धार्मिक विधीनंतर विविध डोल्यांचे विसर्जन करण्यात आले.
मोहरम उत्सव शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी मोहरम कमिटीचे अध्यक्ष अल्ताफ शेठ तांबोळी, मार्गदर्शक शौकत नालबंद, सोहेल पठाण वस्ताद, फारुक जमादार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

चौकट
शाहू महाराज जयंती व मोहरमनिमित्त विविध उपक्रम
छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती आणि मोहरम उत्सवानिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शिवजयंती उत्सव समिती तसेच बहुजन विचारी संघटनांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मोहरम कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सचिन काळे, अतुल फंड, सचिन गायकवाड, महादेव फंड, दिनेश भांडवलकर, नितीन खटके, गणेश कुकडे आदी उपस्थित होते. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT