पुणे

करमाळा पंचायत समिती सभापती पदासाठी पूजा ढेरे ;वनमाला सरडे यांच्या नावाची चर्चा

CD

लोगो : करमाळा पंचायत समिती
---
पूजा ढेरे
वनमाला सरडे
---

सभापतिपदासाठी ढेरे आघाडीवर; सरडेंचीही दावेदारी
भाजप-राष्ट्रवादी युतीकडे सत्ता; सभापती-उपसभापती वाटपावर राजकीय गणिते
आण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा
करमाळा, ता. १० : करमाळा तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी वीट गणातून विजयी झालेल्या भाजपच्या पूजा ढेरे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर चिखलठाण गणातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वनमाला सरडे याही सभापतिपदाच्या इच्छुक मानल्या जात आहेत.
करमाळा पंचायत समिती निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (बागल गट आणि माजी आमदार संजयमामा शिंदे गट) यांच्यात युती झाली होती. या युतीला माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा पाठिंबा होता. १२ सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीत बागल-शिंदे युतीला प्रत्येकी चार जागा मिळाल्या, तर आमदार नारायण पाटील यांच्या तालुका विकास आघाडीनेही चार जागा जिंकल्या.
भाजपकडून विजयी झालेले सर्व सदस्य बागल समर्थक असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सदस्य माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक मानले जातात. यापूर्वी पंचायत समितीवर आमदार नारायण पाटील यांची सत्ता होती. त्यावेळी ते शिवसेना पक्षात होते. मात्र यावेळी निवडणुकीनंतर सत्ता परिवर्तनाचे चित्र दिसत आहे.

सभापतिपदाची संधी सुरवातीला भाजपला मिळाल्यास पूजा ढेरे यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळाल्यास वनमाला सरडे यांचे नाव पुढे येऊ शकते. भाजपकडे सभापतिपद गेल्यास उपसभापतिपद शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता असून, त्या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांचे नाव चर्चेत आहे. उलटपक्षी सभापतिपद शिंदे गटाला मिळाल्यास उपसभापती पदासाठी बागल गटाकडून नानासाहेब झाकणे किंवा सोनाली तकीक यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, करमाळा पंचायत समितीचे सभापतिपद ओबीसी महिलासाठी राखीव आहे. उमरड व वीट हे दोन गण ओबीसी महिला राखीव होते. उमरड गणातून तालुका विकास आघाडीच्या अदिती पाटील विजयी झाल्या असून, वीट गणातून भाजपच्या पूजा ढेरे निवडून आल्या आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वनमाला सरडे आणि भाजपच्या सोनाली तकीक यांच्याकडे कुणबी- मराठा दाखला असल्याने त्या देखील ओबीसी महिला सभापतिपदाच्या दावेदार ठरू शकतात.
---
चौकट
आमदार पाटील गट ‘निर्णायक’ ठरण्याची शक्यता
बागल गट व संजयमामा शिंदे गट यांच्यात सभापती- उपसभापती पदाचे वाटप समन्वयाने झाले नाही, तर आमदार नारायण पाटील यांच्या तालुका विकास आघाडीच्या चार सदस्यांचे महत्त्व वाढू शकते. दोन्ही गटांकडून त्यांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र या चर्चेचा अंतिम निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

Mumbai Missing link Project: मिसिंग लिंकच्या बोगद्याखाली गुप्त बोगदा, आव्हानात्मक काम झालं सोपं; भविष्यातही बनणार संकटमोचक!

माफी नंतरही वाद शमेना! धीरेंद्र शास्त्रींची शिवभक्त असल्याचं दाखवण्याची धडपड, शिवरायांचे चित्र असलेला सदरा केला परिधान

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात वीजनिर्मिती प्रकल्पातील दोन संच पडले बंद

Shivaji University Hostel food issue : शिवाजी विद्यापीठ वसतिगृहातील जेवणात अळ्या, किडे; शिवसेना आक्रमक, वारंवार घटनेने विद्यार्थ्यांची हेळसांड

SCROLL FOR NEXT