पुणे

करमाळा नगरपालिकेच्या कोंडवाड्यात गोवंशाची हेळसांड; चारा, पाणी व स्वच्छतेअभावी जनावरांवर नरकयातना

CD

करमाळा पालिकेच्या कोंडवाड्यात गोवंशाची हेळसांड

करमाळा, ता. ५ : शहरातील मोकाट जनावरांचा त्रास कमी करण्यासाठी करमाळा नगरपालिकेकडून पकडलेल्या गोवंशाला कोंडवाड्यात ठेवण्यात येते. मात्र या कोंडवाड्यात अस्वच्छता, चारा-पाण्याचा अभाव आणि अपुऱ्या सुविधांमुळे जनावरांची हेळसांड होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे मुक्या जनावरांच्या संगोपनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

सध्या पावसाळ्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढलेला असताना शहरातील जुन्या मुख्याधिकारी निवासस्थानालगत उभारलेल्या कोंडवाड्यात घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरल्याचे दिसून येत आहे. प्रशासक कालावधीत उभारण्यात आलेल्या या कोंडवाड्याला केवळ भिंतींचा आडोसा आणि दर्शनी बाजूस लोखंडी गेट असून, कायमस्वरूपी छताची व्यवस्था नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
नगरपालिकेने मोकाट जनावरे पकडण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली असून सध्या एका जनावरामागे सुमारे तीन हजार रुपये खर्च होत असल्याची माहिती आहे. प्रशासक कालावधीत हा खर्च आठ हजार रुपयांहून अधिक होता, अशी माहितीही पालिका सूत्रांकडून मिळाली. एवढा खर्च होत असतानाही जनावरांना आवश्यक मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आषाढी वारीपूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील काही गोवंश पकडून या कोंडवाड्यात ठेवण्यात आला होता. मात्र जनावरांना वेळेवर चारा दिला जातो का, याबाबतही नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ठेवलेली सिमेंटची टाकी अनेकदा रिकामी असल्याचे दिसून येत असून परिसरात दुर्गंधी पसरल्याची तक्रार आहे.
कोंडवाड्यात साचलेला कचरा नियमितपणे हटवून स्वच्छता राखावी तसेच जनावरांना स्वच्छ पिण्याचे पाणी व पुरेसा चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक विपुल पुजारी यांच्याशी संपर्क साधला असता, कोंडवाड्यातील जनावरांची योग्य निगा राखली जात असून त्यांना वेळेवर चारा व पाणी दिले जाते, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT