कर्मवीर अण्णांचे योगदान ऐतिहासिक
प्रा. डॉ. शरद गायकवाड; महिला महाविद्यालयात मार्गदर्शन
सातारा, ता. ४ ः लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे हे जसे महाराष्ट्राचे नररत्न आहेत, तसेच रयत शिक्षण संस्था उभारून ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यात पोहोचविणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदानही ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी केले.
येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात मराठी विभाग व लोकशाहीर महाराष्ट्रभूषण पुंडलिक फरांदे प्रतिष्ठान यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत अण्णा भाऊ साठे जयंती, लेखन प्रेरणा दिन, मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे होते. यावेळी शाहीर फरांदे प्रतिष्ठानचे सचिव वैभव फरांदे, उपप्राचार्य प्रा. डॉ. गजानन भोसले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक प्रा. डॉ. जयश्री आफळे, मराठी विभागप्रमुख डॉ. कांचन नलवडे, डॉ. इन्नुस शेख, डॉ. जयश्री बाबर, प्रा. निरंजन फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. गायकवाड म्हणाले, ‘‘सातारा हे मराठ्यांचं काळीज आहे, असे अण्णा भाऊ म्हणायचे. याच साताऱ्यात कर्मवीरांनी न्याय, समता व स्वातंत्र्याचे संस्कार विद्यार्थ्यांवर केले. अण्णा भाऊ साठे यांनी एका हातात लेखणी घेतली. एक पाय तुरुंगात, तर एक पाय रणमैदानात ठेवून मराठी माणसांच्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी लढा लढला. कर्मवीर अण्णांचे आणि अण्णा भाऊ साठे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.’’
शाहीर वैभव फरांदे, उपप्राचार्य प्रा. डॉ. गजानन भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. निरंजन फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कांचन नलवडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जयश्री बाबर यांनी आभार मानले.
-----------------------
40162
सातारा ः कार्यक्रमात बोलताना डॉ. शरद गायकवाड, त्या वेळी इतर.
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.