BAR26B12946
बार्शी : कर्मवीर डॉ. जगदाळे जयंतीनिमित्त व्याख्याते देशमुख यांचे स्वागत करताना डॉ. यादव यांच्यासह पदाधिकारी.
कर्मवीरांचे विचार तरुणांनी
अंगीकारावे : इंद्रजित देशमुख
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. १ : कर्माचे भान ज्याला असते तो कर्मवीर असतो, म्हणूनच कर्मवीर मामांचे विचार दैनंदिन जीवनात जोपासा. ‘हम दो, हमारे दो, माँ-बाप फेक दो’ ही विचारसरणी सध्या उदयास येत आहे. त्यापासून दूर रहा. करुणेला कृतीची जोड द्या. स्वतःला ओळखा. त्यातूनच आपले करिअर शोधा, असे आवाहन ज्येष्ठ वक्ते इंद्रजित देशमुख यांनी केले.
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात इंद्रजित देशमुख बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बी. वाय. यादव, संस्थेचे पदाधिकारी पी. टी. पाटील, जयकुमार शितोळे, अरुण देबडवार उपस्थित होते.
श्री देशमुख म्हणाले, की स्वतःच्या बुद्धिमत्तेची ओळख करून घ्या. स्वतःच्या ध्येयावर प्रेम करा. पालकत्वाची भूमिका समजून घ्या. मोबाईलपासून स्वतःला सांभाळा. अध्ययनशील रहा. आई-वडिलांचा आदर करा. राष्ट्रप्रेम जागृत ठेवा सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, संत गाडगेबाबा, बाबा आमटे, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा भाऊ साठे, महाराजा सयाजीराव गायकवाड, बॅरिस्टर पी. जी. पाटील यांचा आदर्श तरुणांनी ठेवला पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी केले.
प्रास्ताविक संस्थेचे जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील यांनी केले. यात त्यांनी संस्थेच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. ज्योती डमरे यांनी केले तर प्राचार्य डॉ. दीपक गुंड यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.