पुणे

देश संक्षिप्त

CD

दक्षिण भारत

विधान परिषदेच्या
सभापतींचा राजीनामा
बंगळूर : कर्नाटकच्या विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. काँग्रेस सरकारकडून राजीनाम्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेस नेत्यांनी अविश्वास ठराव आणण्याची धमकी दिल्याचेही होरट्टी यांनी सांगितले. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांची भेट घेतली. दरम्यान, शिवकुमार यांनी होरट्टी यांनी स्वतःहून राजीनामा दिल्याचे सांगितले.
----
कावेरीप्रश्नी चर्चेचा
प्रस्ताव माझाच : विजय
चेन्नई : कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघण्याची आशा असल्याने शेजारील कर्नाटकसोबत चर्चा करण्याचा प्रस्ताव आपणच मांडला होता, असे तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. कावेरीप्रश्नी सवंग राजकारण करायचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्नावर कायदेशीर मार्गानेच पुढे जाण्याच्या सरकारच्या भूमिकेत कोणताही बदल झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
-----
केरळात पिकांचे
९९ कोटींचे नुकसान
कोची : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे पिकांचे प्राथमिक अंदाजानुसार ९९.२९ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, केंद्राकडे मदत व पुनर्वसनासाठी ११० कोटी रुपयांची आर्थिक मदत मागितल्याचे कृषिमंत्री टी. सिद्दिकी यांनी शुक्रवारी सांगितले. गुरुवारपर्यंत ३६,८२९ शेतकरी बाधित झाले असून ३,२६४ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. सविस्तर अहवालानंतर या आकडेवारीत वाढ होऊ शकते, असेही सिद्दिकी यांनी सांगितले.
---
मध्य भारत

चोरीच्या संशयावरून
तिघांना मारहाण
छिंदवाडा : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात चोरीच्या संशयावरून तीन तरुणांची गळ्यात काटेरी तारांचे बंडल घालून धिंड काढण्यात आली आणि स्थानिकांनी त्यांना चपलांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या इकलहरा परिसरातून केबलची चोरी केल्याचा संशय तिघांवर होता. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे.
----

पूर्व भारत

वीज पडून
चौघांचा मृत्यू
रांची : झारखंडमधील हजारीबाग आणि चतरा जिल्ह्यांत गुरुवारी वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला. हजारीबागमध्ये कांचनपूर गावात शेतात काम करणाऱ्या एका जोडप्याचा वीज पडून मृत्यू झाला. बारकठ्ठा भागातील चौथा गावात एका महिलेलाही वीज पडल्याने प्राण गमवावे लागले. चतरा जिल्ह्यात कल्याणपूर बाजारातून हफुआकडे जात असलेल्या एका पंचवीस वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला.
----
राजदकडून
समित्या बरखास्त
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाने बिहारमधील जिल्हा, तालुका आणि पंचायत पातळीवरील सर्व संघटनात्मक समित्यांसह विविध सेल आणि संलग्न संघटना तत्काळ बरखास्त केल्या. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मंगनीलाल मंडल यांनी गुरुवारी रात्री याबाबत घोषणा केली. नुकत्याच झालेल्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील पक्षाच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. राज्यभर नव्या समित्यांची पुनर्रचना लवकरच करण्यात येईल, असे आमदार भाई वीरेंद्र यांनी सांगितले.
----
ईशान्य भारत

रुग्णवाहिकेतून
ड्रग्जची तस्करी
ऐझॉल : मिझोराममधील ऐझॉल जिल्ह्यात रुग्णवाहिकेतून ४५ कोटी रुपये किमतीच्या मेथॅम्फेटामाइनच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी रुग्णाचा बनाव करणाऱ्या महिलेसह तीन तस्करांना अटक करण्यात आली. आसाम रायफल्स आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) संयुक्त पथकाने सेलिंग परिसरात कारवाई करून रुग्णवाहिकेतून मेथॅम्फेटामाइनच्या १५ किलो गोळ्या जप्त केल्या.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा पहिला हप्ता अखेर वितरीत, नवीन कर्ज लगेच मिळणार का? मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितलं!

Vaibhav Sooryavanshi: भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी वैभव सूर्यवंशी सज्ज; नागपूरात पोहोचला... कोणाची मदत घेतोय?

Abhijeet Dipke: सरकारची अमेरिकन कंपनीच्या मदतीने दिपकेवर पाळत? वैयक्तिक माहिती प्रदर्शित केली?

Marathi News Live Updates : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहन दोन वेळा पलटी

Palghar News: पोषण आहाराला कात्री, डहाणूतील ३५ आश्रमशाळांमध्ये चपातीचा पुरवठा बंद

SCROLL FOR NEXT