Karnataka Election 
पुणे

Karnataka Election : कर्नाटकात काँग्रेस विजयी! पुण्यात धंगेकरांचं सेलिब्रेशन; केला भन्नाट डान्स | Video

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसच्या या विजयाचं पुण्यातील कसब्यातही जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. काँग्रेसचे कसब्यातील आमदार रविंद्र धंगेकर यांनी हा विजय साजरा केला. यावेळी त्यांनी काँग्रेस भवनासमोर आपल्या कार्यर्त्यांसोबत ठेका धरला.

तब्बल ३४ वर्षांनंतर राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसने आपला विक्रम स्थापित केला आहे. १९८९ नंतर प्रथमच काँग्रेसने राज्यात १३६ जागा जिंकल्या असून भाजपला मोठा धक्का बसल्यामुळे देशात पुन्हा काँग्रेस राज येणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका पार पडल्या. काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी यांनी हजेरी लावली होती. तर भाजपकडून मोदी, शाह यांनी हजेरी लावूनही त्याचा काही फायदा झाला नाही. काँग्रेसनी १३६ जागांवर विजय मिळवत एकहाती विजय मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar Detained : कन्हैया कुमार यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात; अटकेवरून राजकीय वाद

Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना टायफॉइडची लागण, Video शेअर करत दिली माहिती; CJP आंदोलनाचं काय होणार?

मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, मला इथंच रहायचंय; फडणवीस दिल्लीत जाणार का? प्रश्नावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

Project Kusha : शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच उद्ध्वस्त होणार? 'मिशन सुदर्शन चक्र'ची जोरदार तयारी, 3 कुशा इंटरसेप्टरची करणार मोठी चाचणी

Live Updates Marathi : गोदावरीची पाणीपातळी घटली, तरीही पूरस्थिती कायम

SCROLL FOR NEXT