karnataka schemes for people economy ajit pawar cm siddaramaiah politics sakal
पुणे

Pune News : अर्थव्यवस्थेवरचा ताण विचारात घेतल्याशिवाय लोकप्रिय घोषणा करता येणार नाहीत - अजित पवार

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडील योजना महाराष्ट्रात राबवा असे सांगितले असले तरी त्या योजनेच्या दुस-या बाजूही तपासून घ्याव्या लागतील, अजित पवार

मिलिंद संगई, बारामती.

बारामती - कर्नाटकमध्ये विविध लोकप्रिय योजना नवीन सरकारने राबविण्याचा निर्णय घेतल्याने तेथील राज्य शासनावर 65 हजार कोटींचा बोजा पडणार आहे, पण लोकांना आश्वासन दिल्याने त्यांनी या योजना कार्यान्वित केल्या असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी दिली आहे.

राज्यात अशा योजना घोषित करताना अर्थव्यवस्थेवर किती ताण येईल हे पाहिल्याशिवाय त्या जाहिर करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली.

सिध्दरामय्या यांना निरोप दिल्यानंतर बारामती विमानतळावर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की स्वताः सिध्दरामय्या तेरा वर्ष कर्नाटकचे अर्थमंत्री आहेत व आताही मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांनी अर्थखाते त्यांच्याकडेच ठेवले आहे, त्यांनी ज्या लोकप्रिय घोषणा केल्या त्याने अर्थव्यवस्थेवर किती ताण येईल याची मला उत्सुकता होती, त्या मुळे मी त्यांच्याशी या बाबत चर्चा केली.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडील योजना महाराष्ट्रात राबवा असे सांगितले असले तरी त्या योजनेच्या दुस-या बाजूही तपासून घ्याव्या लागतील, असे सांगून अजित पवार म्हणाले, ही योजना सुरु झाल्यावर तेथील बसेसमध्ये पुरुषांना व तिकीट काढणा-यांना जागाच मिळत नाही,

अशी माहिती मला समजली. यात मोफत प्रवास योजना दिल्यावर बसेस मध्ये पन्नास टक्के महिला व पन्नास टक्के पुरुष असे काहीतरी करावे लागेल, असे वाटते.

काही योजना निवडणूका जिंकण्यासाठी तर काही योजना जनतेच्या भल्यासाठी असतात, अनेक मान्यवरांची या बाबत वेगळी मते आहेत, त्या मुळे या बाबत बारकाईने विचार करावा लागेल, कारण घोषणा करताना अर्थव्यवस्थेला ती योजना मोफत करणे झेपले पाहिजे, याचाही विचार करावाच लागेल. योजना घोषित केल्यावर ती माघारी घेण्याची नामुश्की यायला नको.

मतविभागणी होऊ नये या साठी काही पक्ष एकत्र आले तर त्याचा परिणाम सत्ताधारी पक्षावर निश्चित होतो, भाजपलाही त्याचीच भीती वाटत आहे, असे पवार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा करणे हा त्यांचा अधिकार आहे, पक्षात लोकशाही आहे त्या मुळे प्रत्येक जण आपले मत मोकळेपणाने मांडू शकतो, वरिष्ठ या बाबत योग्य तो निर्णय घेतील. गेली 32 वर्षे मंत्रीपदासह अनेक पदांवर काम केल्यानंतर आता संघटना मजबूत करण्यासाठी संघटनेत संधी मिळावी अशी मी मागणी केली तर त्यात काही गैर आहे असे वाटत नसल्याचेही पवार म्हणाले.

मुंबई तुंबल्याचे विचारल्यावर किती कामे सुरु आहेत, कामे सुरु असल्याने काही ठिकाणी पाणी साचले आहे, कामे झाल्यावर बघा अजिबात मुंबई तुंबणार नाही, असा उपरोधिक टोला त्यांनी सरकारला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT