पुणे

कार्तिकी यात्रेत अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स व डिजिटल फलकांना बंदी १८ ते २४ नोव्हेंबरदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू – उपविभागीय अधिकारी सचिन इथापे

CD

कार्तिकी यात्रेत अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्सला बंदी!
१८ ते २४ नोव्हेंबरदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. १८ : कार्तिकी यात्रेच्या काळात भाविकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी पंढरपूर शहरासह पंढरपूर व मोहोळ तालुक्यांतील सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, फ्लेक्स आणि डिजिटल फलक लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. आषाढी यात्रेदरम्यान ३० फूट उंचीचे दोन डिजिटल फलक कोसळल्याच्या घटनांनंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून १८ ते २४ नोव्हेंबरदरम्यान हे निर्बंध लागू केले आहेत. उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी सचिन इथापे यांनी याबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

मंदिर परिसर, चंद्रभागा नदी व घाट, ६५ एकर परिसर, पालखी मार्ग, प्रमुख रस्ते, चौक, एसटी व रेल्वे स्थानक, तहसील कार्यालय आणि हेलिपॅड परिसरासह सर्व सार्वजनिक ठिकाणी हे निर्बंध लागू राहतील. रस्ता दुभाजक, विद्युत खांब, झाडे, पूल, पदपथ आणि शासकीय इमारतींवर फलक लावण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे.
परवानगीयोग्य ठिकाणी फलक उभारण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. आवश्यकतेनुसार नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनिअरचे स्थैर्य प्रमाणपत्रही सादर करावे लागणार आहे. मुद्रक आणि प्रिंटिंग व्यावसायिकांनीही परवानगीशिवाय फलक छापू नयेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
आदेशाचे उल्लंघन करून लावलेले अनधिकृत फलक नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाकडून हटविण्यात येणार आहेत. हे फलक हटविण्यासाठी झालेला खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे. तसेच उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ आणि महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपण प्रतिबंधक अधिनियम १९९५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ऐतिहासिक भेट! चीनमध्ये पहिल्यांदाच एकत्र आले ट्रम्प, पुतिन अन् शी जिनपिंग; बैठकीत काय चर्चा होणार?

Devuthani Ekadashi Do's & Don'ts: देवउठणी एकादशीला चुकूनही करू नका 'या' ६ चुका; व्रत करणाऱ्यांनी लक्षात ठेवा महत्त्वाचे नियम!

Ball Tampering 2018: कमिन्ससह स्टार्कही अडकणार? ज्या बॅनक्रॉफ्टने सँडपेपरचा वापर केला, त्यानेच अखेर केला मोठा गौप्यस्फोट

४ राशींचे नशीब चमकणार, वक्री शनी देणार मेहनतीचं फळ; अडकलेली कामंही पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : आयफोनच्या ईएमआयवरून वाद; मित्राची चाकूने वार करून हत्या

SCROLL FOR NEXT