पुणे

सोलापूर- ‘व्हीआयपी दर्शन’ बंद ठेवण्यासह; दर्शन रांगेतील घुसखोरी रोखण्याचे पालकमंत्र्यांचे सक्त आदेश

CD

‘व्हीआयपी दर्शन’ बंद ठेवण्यासह
दर्शन रांगेतील घुसखोरी रोखा

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे कार्तिकी वारी तयारी आढावा बैठकीत आदेश

अॅग्रोवन वृत्तसेवा
पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळावे, यासाठी यात्रा काळात व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवण्याचे आणि दर्शन रांगेतील घुसखोरी रोखण्याचे सक्त निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी (ता. १८) प्रशासनाला दिले आहेत. आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी वारीही यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कार्तिकी वारीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार समाधान आवताडे व आमदार अभिजीत पाटील (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दर्शन रांगेत कोणतीही घुसखोरी होणार नाही, याची दक्षता पोलीस प्रशासन आणि मंदिर समितीने घ्यावी. भाविकांना त्रास होऊ नये म्हणून व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद राहील. तसेच मंदिर समितीने नेमलेल्या सुरक्षारक्षकांच्या चारित्र्याची पडताळणी (कॅरेक्टर व्हेरिफिकेशन) करून अहवाल सादर करावा आणि कर्मचाऱ्यांनी भाविकांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना गोरे यांनी केल्या.

पालकमंत्री गोरे म्हणाले, चंद्रभागा नदीपात्रात होडीतून प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी पुरेशा प्रमाणात लाइफ जॅकेट उपलब्ध करून द्यावेत. तसेच, प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) वारकऱ्यांच्या वाहनांना विनाकारण अडवून त्यांची गैरसोय करू नये. पंढरपूर शहरातील स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देत रस्ते तातडीने खड्डेमुक्त करावेत. दर्शन रांगेत स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, मॅट आणि प्रकाशाची व्यवस्था करावी. तसेच वाखरी येथील जनावरांच्या बाजारात आवश्यक सुविधा देऊन बाजार संपल्यानंतर पालखीतळाची तातडीने स्वच्छता करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीच्या सुरुवातीला उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी महेश रोकडे आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी वारीच्या तयारीचा व शासकीय महापूजेच्या नियोजनाचा आढावा सादर केला.

----पूर्ण-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रॅलीत फुलांच्या उधळणीसाठी आलेल्या JCBने चिरडले, भाजप नेत्याच्या मुलाचा मृत्यू; आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बाळासाहेबांचा फोटो फाडल्याने शिवसैनिक आक्रमक, शिवसेना भवनासमोर ठाकरेसेनेचं आंदोलन; शायना एनसींची पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी

Mumbai Ahmedabad Highway: एकापाठोपाठ चार अवजड वाहने भिडली; आंबोलीत अपघातामुळे वाहनांच्या रांगा

Vantara Elephant Treatment : कोल्हापुरातील शिरोळमधील आणखी एका हत्तीणीवर वनताराकडून होणार उपचार; सहा डॉक्टरांचे पथक दाखल

Tarali Pumped Storage Project : तारळी प्रकल्पाचे काम कधी आणि कसे सुरू झाले? पर्यावरण व वन्यजीव मंजुरीबाबत अदानी ग्रीन एनर्जीने दिली 'ही' महत्त्वाची अपडेट, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT