Parking sakal
पुणे

Pune News : कर्वे रस्त्यावरील आंदोलनाला पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा

कर्वे रस्त्यावरील नो पार्किंग हटविण्यासाठी होणाऱ्या आंदोलनाला पुणे व्यापारी महासंघाने पाठिंबा दिल्याचे शुक्रवारी जाहीर कऱण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कर्वे रस्त्यावरील नो पार्किंग हटविण्यासाठी होणाऱ्या आंदोलनाला पुणे व्यापारी महासंघाने पाठिंबा दिल्याचे शुक्रवारी जाहीर कऱण्यात आले.

कर्वे रस्त्यावर खंडुजीबाबा चौक ते करिश्मा सोसायटी दरम्यान वाहतूक पोलिस, महापालिकेने गेल्या चार वर्षांपासून नो पार्किंग केले आहे. या रस्त्यावरील मेट्रो, उड्डाण पुल यांची कामे आता पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर दुतर्फा पार्किंग पूर्ववत करावे, अशी कर्वे रस्ता व्यापारी असोसिशनची मागणी आहे.

त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून असोसिएशनचे पदाधिकारी महापालिका, वाहतूक पोलिसांकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु, वाहतूक पोलिसांनी त्यांचा अंतिम अहवाल अद्याप महापालिकेला दिलेला नाही. त्यामुळे पार्किंग खुले कऱण्याबाबतचा निर्णय घेता येत नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

वाहतूक पोलिस आणि महापालिकेडून होणाऱ्या दिरंगाईच्या निषेधार्थ कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन आणि मनसेची जनाधिकार सेना येत्या तीन-चार दिवसांत आंदोलन करणार आहेत. त्याला पुणे व्यापारी महासंघ पाठिंबा देत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले. या बाबत पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही रांका यांनी सांगितले.

‘कर्वे रस्त्यावर ५०० हून अधिक दुकाने आहेत. चार वर्षांपासून त्यांच्या व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे आता तरी, या रस्त्यावरील पार्किंग पूर्ववत करण्याची गरज आहे. महापालिका, वाहतूक पोलिस व्यावसायिकांची अडवणूक करणार असेल तर, आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.’

- ॲड. फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT