करवंद वस्ती, अंजनडोह
परिसरात बिबट्यासह पिल्ले
वनविभागाने पिंजरे लावण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
करमाळा, ता. ७ : करमाळा तालुक्यातील करवंद वस्ती परिसरात गुरुवारी (ता. ६) बिबट्यासह त्याची दोन पिल्ले दिसल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील काही शेतकरी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास शेतातून घरी जात असताना त्यांना बिबट्या व त्याची दोन पिल्ले दिसून आली. या शेतकऱ्यांनी मोबाईलवर त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
यानंतर शनिवारी (ता. ७) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अंजनडोह परिसरातही बिबट्या दिसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी घबराट पसरली आहे. काही वर्षांपूर्वी अंजनडोह येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची आठवण ताजी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.