कऱ्हाडला पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी देखरेख पथक
कऱ्हाड, ता. २८ ः सकाळी साडेसहाची वेळ... नळाला खळाळून पाणी आले, की अंगणात पाण्याचा मारा करणे, गाड्या चकचकीत धुणे किंवा नळ चालू ठेवून इतर कामे उरकणे, कऱ्हाडकरांची ही रोजचीच सवय. ती आता थांबवावी लागणार आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पालिकेने अशांवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र फ्लाइंग स्कॉड स्थापन केले आहे.
पावसाळा संपताच शहरात संभाव्य पाणीटंचाईचे संकट आल्याने कऱ्हाड नगरपालिका प्रशासन अखेर खडबडून जागे झाले आहे. जलस्रोत आटत असताना दुसरीकडे शहरात मात्र पिण्याच्या पाण्याचा बेसुमार अपव्यय होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या उधळपट्टीला आळा घालण्यासाठी आणि पाण्याचा थेंब ना थेंब वाचवण्यासाठी पालिकेने आता कठोर आणि आक्रमक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पाणी सुटल्यानंतर पहाटेच्या वेळी पालिकेच्या पथकाची शहरात सरप्राइज व्हिजिट असणार आहे. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी पालिकेने स्वतंत्र विशेष देखरेख पथक म्हणजेच फ्लाइंग स्कॉडची स्थापना केली आहे. ते पथक दररोज शहरात पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर विविध भागांत गस्त घालणार आहे. रस्त्यावर पाणी मारणे, पिण्याच्या पाण्याने वाहने धुणे, पाण्याची गळती तपासणे, घराबाहेर असणाऱ्या किंवा सार्वजनिक नळांना तोट्या नसणे, नळ चालू सोडून पाणी वाया घालवणे, अशा प्रकारांवर हे पथक थेट नजर ठेवणार आहे. शहरात एकीकडे पाणीटंचाईची परिस्थिती बिकट असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा असा निष्काळजी वापर होणे अत्यंत गंभीर आहे. पालिकेच्या कारवाईमुळे शहरात नक्कीच शिस्त येईल, दंडाच्या किंवा कारवाईच्या भीतीपोटी नव्हे, तर आपल्याच भविष्यातील पाण्यासाठी प्रत्येक कऱ्हाडकराने स्वयंशिस्त पाळणे आता काळाची गरज बनली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.