रुग्णवाहिकेच्या धडकेत
दुचाकीस्वार जागीच ठार
केसकरवाडीजवळ अपघात; एक जखमी
कास, ता. २९ : सातारा- मेढा रस्त्यावर केसकरवाडी जवळ रुग्णवाहिका आणि दुचाकीत समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर अन्य एक जण जखमी झाला. त्याच्यावर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार साताऱ्याहून मेढ्याकडे विरोधी बाजूने जात असताना अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. महाबळेश्वर पालिकेची रुग्णवाहिका (एमएच ११ एबी ८१९५) ही
रुग्णाला घेऊन सातारा येथे निघाली होती. ती केसकरवाडी जवळ आली असता सातारा बाजूकडून मेढ्याकडे जाणारे दुचाकी वाहन (एमएच ११ डीई १२८७) रस्त्याच्या उलट दिशेने आल्याने भरधाव रुग्णवाहिकेने त्यांना केसकरवाडी गावच्या हद्दीत जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील अनिल विष्णू धनावडे (वय २७, मूळ रा. तापोळा, हल्ली रा. बैलबाजार, मेढा) हा जागीच ठार झाला. अनिल डांबरावर आपटून डोक्याला मागील बाजूला जबर मार बसल्याने ठार झाला.
अनिल हा मेढा येथे एका शोरूममध्ये काम करत होता, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला अभिजित संजय जाधव (वय २५, रा. गांजे) हा जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
......................................................
फोटो :........04490
अनिल विष्णू धनावडे
......................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.