पुणे

कास - कास पठार वननिवासामुळे पर्यटकांची सोय....

CD

कास पठारावर वन निवासाचे नूतनीकरण

हजाराे पर्यटक, अधिकाऱ्यांची साेय; उपवनसंरक्षक अमाेल सातपुतेंनी केले लाेकार्पण

कास, ता. १ : सातारा जिल्‍हा हा पर्यटन जिल्‍हा म्‍हणून नावारूपाला येत आहे. दरवर्षी हजारो पर्यटक जिल्‍ह्यातील विविध ठिकाणांना भेट देत असतात. कास पठार पुष्‍पहंगामाला देखील देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्‍येने हजेरी लावत असतात, तसेच वरिष्‍ठ अधिकाऱ्यांचे दौरे देखील होतात, त्‍यांच्‍या निवासाची सोय करण्‍यासाठी वन विभागाने कास पठार वन निवास उभारून मोठी सोय केली आहे. सातारा वन विभाग मुख्‍यालयाच्‍या आवारात नूतनीकरण केलेल्या या वन निवासाचे लाेकार्पण नुकतेच करण्‍यात आले.
उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्‍ते या वन निवासाचे लाेकार्पण करण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) प्रदीप रौंधळ, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्‍यजीव) दिगंबर जाधव, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व कॅम्प) जयश्री जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे, वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्‍थित होते.
वन विभागाच्‍या जागेत असलेल्‍या जुन्‍या इमारतीचे नूतनीकरण करून दोन सूट तयार करण्‍यात आले आहेत. एकाचे अजिंक्‍यतारा व दुसऱ्याचे सज्‍जनगड असे नामकरण करण्‍यात आले आहे. यासोबतच वनपाल निवासाचेही उद्‌घाटन करण्‍यात आले. या दोन्‍ही इमारतींमध्‍ये सौरऊर्जेची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. या कामामध्‍ये सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ आणि वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे यांनी परिश्रम घेतले. दरम्‍यान, यावेळी परिसरामध्‍ये वृक्षलागवड देखील करण्‍यात आली.


फोटो :........KSS26B04660/ KSS26B04659
सातारा : कास पठार वन निवासाच्‍या उद्‌घाटनप्रसंगी अमोल सातपुते, प्रदीप रौंधळ, दिगंबर जाधव, जयश्री जाधव, संदीप जोपळे, गणेश महांगडे आदी.
दुसऱ्या छायाचित्रात नूतनीकरण करण्यात आलेली वन निवास इमारत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

शेतमाल विक्री करणाऱ्यांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या अनुज्ञप्ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू; नेमके कारण काय?

T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...

Latest Marathi News Update : तामिळनाडू कॉंग्रेसमुक्त पहिले राज्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT