Shailesh Tilak Hemant Rasane BJP
Shailesh Tilak Hemant Rasane BJP Sakal
पुणे

Kasaba ByPoll : रासनेंच्या शक्तीप्रदर्शनाकडे टिळक कुटुंबीयांनी पाठ का फिरवली? स्वतः दिलं कारण...

सकाळ डिजिटल टीम

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने टिळक कुटुंबीयांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांनी दिली आहे. ते अर्ज भरत असताना टिळक कुटुंबीय गैरहजर राहिल्याने आता चर्चांना उधाण आलं आहे.

मात्र मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी स्वतः यामागचं कारण 'सकाळ'च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं आहे. ते म्हणाले, "काही विशेष कारण नाही. मुक्ताताई जाऊन जेमतेम महिनाभर झाला आणि या गोष्टी इतक्या पटापट झाला की आम्हाला दुःखातून सावरायला पुरेसा वेळ मिळाला नाही. थोडा वेळ लागेल आम्हाला. आमची याबाबतची भूमिका आम्ही पक्षाकडे मांडली आहे. पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. पण नाराजी नाही. साधारणपणे घरातल्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाते, पण पक्षाने विचार करून, अभ्यास करून निर्णय घेतला असेल. "

हेमंत रासने यांनी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र टिळक कुटुंबीयांच्या गैरहजेरीमुळे त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT