Abhijeet Bichukale Sakal
पुणे

Kasaba ByPoll : कसब्यातले प्रमुख प्रश्न कोणते? पत्रकारांनी विचारताच बिचुकले संतापले! 

अभिजीत बिचुकले आणि लहुजी छावा संघटनेमध्ये भांडणंही झाली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. यामध्ये आज पत्नीचा उमेदवारी अर्ज भरायला आलेला बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले चर्चेचा विषय ठरला. कसब्यातले प्रमुख प्रश्न कोणते आहेत, असा प्रश्न विचारला असता बिचुकले पत्रकारांवर संतापला.

कसबा निवडणुकीसाठी आपली पत्नी अलंकृता यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अभिजीत बिचुकले आला होता. त्यावेळी माध्यमांनी त्याला कसब्यातले प्रमुख प्रश्न कोणते याविषयी विचारलं. त्यावर त्याने उत्तर दिलं, "जे निवडून गेलेले , त्यांनी काय केलं, त्यांना विचारा. मला प्रश्न माहित नाहीत, जनतेला माहित आहेत. जनतेसाठी मी सर्वस्व आहे. तुम्ही सांगा मी सोडवणार.

या मतदारसंघातून निवडणूक लढवणार तर तिथला तुम्ही काही अभ्यास केला असेल ना, असं पत्रकारांनी विचारलं असता बिचुकलेने माध्यम प्रतिनिधींनाच सुनावलं आहे. माझा अभ्यास काढू नका, तुझा किती अभ्यास आहे. मी कसब्याचा उमेदवार आहे. उद्याचा नेता, भावी मुख्यमंत्री आहे. हा माझा स्थायीभाव आहे, मी चिडलो नाहीये, अशा शब्दात बिचुकलेने पत्रकारांना सुनावलं.

पुढे अधिक प्रश्न विचारले असता तुम्ही कोणाकडून पैसे घेऊन आला आहात का असं म्हणत त्याने पुन्हा एकदा पत्रकारांशी वाद घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर, सह्याद्री आणि गोदावरी एक्सप्रेस बंद; महाराष्ट्रातील ट्रेन सेवा कमी, यूपी-बिहारसाठी स्पेशल गाड्यांचा पाऊस

UP: योगींचे लाडक्या बहिणींना 'गिफ्ट'! हजारो जणींना नियुक्ती पत्रे; पुढच्या महिन्यापासून पगार सुरू, जाणून घ्या काय आहे खास?

Hingoli News: रब्बी उत्पादकांना दिलासा; ई-पीक पाहणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेवटची संधी

Latest Marathi News Live Update : शेअर बाजारात सेन्सेक्स 1,800 अंकांनी कोसळला

Pune Passport News: मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालय पाषाणला; नवीन ठिकाणाहून ३० मार्चपासून सेवा, पुणे व परिसरातील नागरिकांना दिलासा!

SCROLL FOR NEXT