Anand Dave Sakal
पुणे

Kasaba Bypoll : "फक्त आणि फक्त हिंदूंच्या घरात.."; निवडणूक जिंकण्यासाठी आनंद दवेंची अजब स्ट्रॅटेजी

आनंद दवे हे हिंदू महासंघाचे अध्यक्ष आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कसबा पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. विविध संघटना, पक्षातल्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही अर्ज भरला आहे. त्यानंतर त्यांनी आपली रणनीतीही सांगितली आहे.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आनंद दवे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. दवे म्हणाले, "आम्ही हिंदुत्वाची लढाई लढतोय. आम्हाला हिंदू समाजासाठी काम करतोय. त्याचा कोणावर काय परिणाम होतोय, याची हिंदू महासंघाने काळजी करण्याचं काहीच कारण नाही. उमेदवार जेव्हा निवडणूक लढतो, तेव्हा प्रत्येकाचा ठोकताळा असतो. त्यांना शुभेच्छा, पण हिंदू महासंघच निवडून येणार आहे".

या निवडणुकीतल्या रणनीतीबद्दल बोलताना आनंद दवे म्हणाले, "ही निवडणूक आम्ही गंभीरतेने आणि जिंकण्यासाठीच लढवत आहोत. आम्ही अर्ज मागे घेणारच नाही. माझा अजेंडा म्हणजे पुण्येश्वर मंदीर मुक्त करावं. हिंदूंवर झालेल्या अन्यायाविरोधात ज्यांना आवाज उठवायचा आहे, त्यांनी माझ्यासोबत यावं. आम्ही फक्त आणि फक्त हिंदूंच्या मतासाठी हिंदूंच्या घरात जाऊन प्रचार करणार आहे. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

Chhatrapati Sambhajinagar: कचरा संकलनासोबत कर वसुलीवरही नजर; नव्या कंपनीला महापालिका आयुक्तांच्या सूचना

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिवनिका संस्थानमधील ट्रस्टींचीही तपासणी होणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Chhatrapati Sambhajinagar: एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत ६९.३३ टक्के उपस्थिती; स्पर्धा परीक्षा;शहरातील ३६ केंद्रांवर ३ हजार ५६९ उमेदवारांची दांडी.

SCROLL FOR NEXT