chandrakant patil said dr babasaheb ambedkar Bhaurao Patil mahatma phule begged for schools
chandrakant patil said dr babasaheb ambedkar Bhaurao Patil mahatma phule begged for schools  Sakal
पुणे

Kasba Chinchwad By-Election: भाजपची रणनिती ठरली! 'या' लोकांवर सोपवली जबाबदारी

सकाळ डिजिटल टीम

Kasba Chinchwad By-Election : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पण अद्याप भाजपनं या जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे पण निवडणूक झालीच तर त्याची रणनीती देखील पक्षानं तयार केली आहे.

त्यासाठी दोन नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. मंत्री आणि भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Kasaba Chinchawad By Election BJP strategy for the by election is decided)

पाटील म्हणाले, भाजपची आजची बैठक ही उमेदवार निवडीसाठी नव्हती. तर या बैठकीत सांगोपांग चर्चा झाली की, इतर पक्षात काय चाललंय? आणि ते काय करणार आहेत? ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोणाशी काशी बोलणी करणं अपेक्षित आहे, याबाबींवर यात चर्चा झाली. त्याचबरोबर गेल्यावेळी कोणत्या बुथवर कमी मतं होती, त्यात वाढ व्हावी यासाठी काय करता येईल? यावरही यावेळी चर्चा झाली.

तीन प्रमुख पाहणार निवडणुकीचं काम

या पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक प्रमुखपदी शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांना नियुक्त केलं आहे. चिंचवड मंडळाचे सरचिटणीस त्यांना मदत करणार आहेत. त्यानंतर दुसरी समिती व्यवस्थात्मक आहे. याचा प्रमुख माजी नगरसेवक बापू काटे यांना केलंय. तिसरी समिती इतर पक्षांशी चर्चा करणारी आहे. याच्या प्रमुखपदी शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्याकडे तर कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोट निवडणुकांचे प्रमुख राज्य सरचिटणीस मुरलीधर मोहोळ असतील. अशा प्रकारे कामाची विभागणी करण्यात आल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

उमेदवार कसा ठरणार?

भाजपची उमेदवार ठरवण्याची पद्धत वेगळी आहे. यामध्ये इच्छुकांची नावं प्रदेशाकडे जातात. प्रदेशाची एक कोअर कमिटी आहे, तर एक पार्लमेंटरी बोर्ड आहे. कोअर कमिटी आणि पार्लमेंटरी बोर्डाकडून ही नावं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडं जातात. त्यानंतर निर्णय दिल्लीतून घोषीत होतो, असंही यावेळी चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

बारावीच्या परीक्षेमुळं मतदानाची तारीख बदलली

चिंचवडची पोटनिवडणूक २७ फेब्रुवारी रोजी जाहीर झाली होती. पण याच दिवशी बारावीची परीक्षा असल्यानं ही तारीख बदलून आता २६ फेब्रुवारी रोजी इथं मतदान होणार आहे. तर २ मार्चला मतमोजणी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT