kasaba peth ganpati  
पुणे

*गणेशोत्सवाच्या १२५ व्या वर्षी, १२५ कलाकार करणार श्रींची महाआरती आणि अथर्वशीर्ष पठण !*

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यातील यंदाचा गणेशोत्सव,  शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करतोय आणि त्या निमित्ताने पुणे महानगरपालिका हा गणेशोत्सव मोठ्या श्रद्धेनं आणि दिमाखात साजरा करतीये. जगाच्या नकाशावर पुण्याचा उल्लेखनीय ठसा उमटवण्यासाठी पुण्याच्या गणेशोत्सवाचाही मोलाचा वाटा आहे.  पुण्याची ओळख असलेल्या या अविष्कारी गणेशोत्सवाच्या या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या मुकुटात पुणे महानगर पालिका मानाचे दोन शिरपेच बसविणार आहे.

या सोहळ्यातील अनेक उपक्रमांपैकी दोन उपक्रमांची नोंद थेट 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये होणार आहे. त्यातील एक उपक्रम म्हणजे शाडू मातीचे पर्यावरणपूरक गणपती, शालेय विद्यार्थ्यांकडून विक्रमी संख्येने एकाच वेळेस बनविले जातील आणि दुसरा उपक्रम म्हणजे पुण्यातील हजारो तरुण-तरुणी ढोल ताशा वादक शिस्तबद्ध रित्या एकत्रितपणे आपला वादनाविष्कार सादर करतील !  या दोन विश्व विक्रमांमुळे पुणे आणि पुण्याचा गणेशोत्सव जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा अधोरेखित होईल.

पुणे मनपाच्या या महत्वाकांक्षी विश्व विक्रमी उपक्रमांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील १२५ नामवंत कलाकारांच्या हस्ते गुरुवार दिनांक २४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता पुण्याचं ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची महाआरती आणि श्री अथर्वशीर्षाचे पठण होणार आहे. श्री गणेशाला भारतीय संस्कृतीत, ६४ कलांचा अधिपती मानले जाते. विविध कलांच्या या दैवताला, विविध कलांचे उपासक पारंपरिक वेशात आपली सेवा श्रींच्या चरणी रुजू करतील. पुणे शहरातील चित्रपट, नाट्य, कला, साहित्य आणि संगीत क्षेत्रातील अभिनेते-अभिनेत्री,गायक - वादक, नर्तक, रंगभूमीवरील रंगकर्मी,तंत्रज्ञ, निवेदक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संयोजक -आयोजक आणि व्यावसायिक श्री गजाननाला, येणारा गणेशोत्सव शांततेत,निर्विघ्नपणे, एकोप्यानं आणि सुरक्षितपणे पार पडावा म्हणून एकत्रितपणे साकडं घालतील. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून मान मिळवलेल्या पुण्यात,  हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी या कलाकारांसह अनेक संस्था सुद्धा पुढे आल्या आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद - पुणे आणि कोथरूड शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद, एकपात्री कलाकार पुणे , शाहीर परिषद , M.A.P पुणे ,बालगंधर्व परिवार , लोककला-लावणी निर्माता व कलावंत संघ , नाट्य निर्माता संघ , ऑर्केस्ट्रा निर्माता संघ , रंगभूमी सेवक संघ , नृत्य परिषद , Sound - Light - Generator Association या संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि सभासद या महाआरतीत सहभागी होणार आहेत.   

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच होणाऱ्या या नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार होऊन महानगरपालिकेच्या या उपक्रमांना शुभेच्छा देण्याचे आवाहन या विविध संस्थांनी आणि रंगकर्मींनी पत्रकार परिषदेत केले आहे .
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT