पुणे

कासारीला होणार टॅंकरने पाणीपुरवठा

CD

तळेगाव ढमढेरे, ता. २५ : कासारीला (ता. शिरूर) टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रशासनाला बुधवारी (ता. २४) आदेश दिले आहेत. त्यानुसार कासारी गावठाण व १४ वस्त्यांवर दररोज १२ हजार लिटर एका टँकरने पाच खेपांद्वारे पुरवठा करण्यात येणार आहे.
गावात ऐन पावसाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईचे तीव्र पडसाद ग्रामस्थांमध्ये उमटले होते. टँकर सुरू करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. २३) ग्रामपंचायत कार्यालयावर ‘हंडा मोर्चा’ काढला होता. पाणीटंचाईची व मोर्चाची ‘सकाळ’मध्ये मंगळवारी आणि बुधवारी बातमी प्रसिद्ध केली होती. प्रसार माध्यम व ग्रामस्थांच्या हंडामोर्चाची त्वरित दखल घेऊन ग्रामसेवक वसंत पवार यांनी तातडीने टँकर मागणीचा प्रस्ताव गटविकास अधिकारी व तहसीलदारांकडे पाठवला होता. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. बारामती येथील मे. अजितदादा सहकारी मोटार वाहतूक संस्थेमार्फत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
टँकर सुरू करण्याचे आदेश दिले त्याबद्दल मोर्चातील युवकांनी व ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, तहसीलदार व जिल्हा प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Nagpur Garage Fire: नोकरीवरून काढल्याच्या रागातून गॅरेजला आग!; २० दुचाकी जळाल्या; माजी कर्मचाऱ्यावर संशय, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

वीर पहाडियाचा रोमँटिक अंदाज, आफिया सय्यदचं पदार्पण; ‘प्रेम कीटाणू’ ठरतोय तरुणाईचा सिनेमा?

SCROLL FOR NEXT