पुणे

संसारात रमलेल्या महिलांची शैक्षणिक लढाई आजपासून

CD

कासारवाडीतील २१ महिलांनी दिला दहावीचा पहिला पेपर

शिक्षणासाठी दुसरी इनिंग सुरू; आत्मविश्‍वासाने देताहेत परीक्षा

रूपेश कदम : सकाळ वृत्तसेवा

दहिवडी, ता. २० : लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करत प्रशासनाने केलेल्या अमूल्य सहकार्यामुळे आपापल्या संसारात पूर्णपणे रमलेल्या माण तालुक्यातील कासारवाडी या गावच्या सरपंचांसह २१ महिलांची शैक्षणिक लढाई आजपासून प्रत्यक्षात सुरू झाली. अतिशय आत्मविश्वासाने या सर्व महिला आज दहावीच्या पहिल्या पेपरला सामोऱ्या गेल्या.
कासारवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे, ग्रामस्थांचे, शिक्षकांचे तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी डिसेंबर महिन्यात सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन या कासारवाडीत आल्या होत्या. त्यावेळी याशनी नागराजन यांनी उपस्थित महिलांना   ‘‘तुमच्यापैकी किती महिला दहावी पास आहेत?’’ असा प्रश्न विचारला होता. यावेळी काही महिलांनी दहावीची परीक्षा न दिल्याचे अथवा अपयश आल्याचे सांगितले. यावर यावर्षी दहावीची परीक्षा देण्याच्या याशनी नागराजन यांनी  केलेल्या आवाहनाला महिलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
त्यानंतर केलेल्या सर्वेक्षणात २५ विवाहित महिला या दहावी पास नसल्याचे आढळून आले. माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे व गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी लेट फी भरून १७ नंबरचा फॉर्म भरण्याची व्यवस्था केली. महिलांच्या परीक्षा फीची ५० टक्के रक्कम पंचायत समितीच्या सेस फंडातून, तर उर्वरित ५० टक्के रक्कम लोकसहभागातून गोळा करण्यात आली. सरपंच छाया सस्ते यांनी स्वतः २० हजारांचे योगदान दिले. सर्व २५ महिला विवाहित असल्यामुळे त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, प्रतिज्ञापत्र सादर करणे आणि प्रशासनाशी समन्वय साधणे हे मोठे आव्हान होते, तरीही प्रशासनाने नियोजनपूर्वक सर्व प्रक्रिया पार पाडून महिलांना परीक्षेस बसवण्यात यश मिळवले. आज २१ महिला इयत्ता दहावीच्या मराठी विषयाच्या पेपरला उपस्थित होत्या.
.......
कोट
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही महिलांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. काही महिलांच्या मुलांनी दहावीची परीक्षा दिली असताना तर काहींची नातवंडं शाळेत शिकत असताना लोक काय म्हणतील, याची लाज बाजूला ठेवून परीक्षा देणं हे आमच्यासाठी मुख्य आव्हान होतं. ते आव्हान स्वीकारून आम्ही आत्मविश्वासाने परीक्षा देत आहोत अन् या परीक्षेत आम्ही नक्कीच यशस्वी होऊ."
‌ छाया सस्ते, सरपंच, कासारवाडी.
........

फोटो
7300

मलवडी (ता. माण) : येथील परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा देण्यास सज्ज झालेल्या छाया सस्ते यांच्यासह २१ महिला. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)
...... पुर्ण......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT