Pune By Election 2023kasba and Chinchwad legislative assembly election announced sakal
पुणे

Pune By Election 2023: कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर

या दोन्ही जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान आणि दोन मार्च रोजी मतमोजणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

या दोन्ही जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान आणि दोन मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने या तारखांची आज घोषणा केली.

कसबा विधानसभेच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदार संघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप या दोघांचे कर्करोगाने निधन झाले. एका मागे एक भाजपचे दोन आमदार निधन पावल्याने पक्षाला एक मोठा धक्का बसला.

आमदारांच्या निधनामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी पुढचा उमेदवार कोण असेल याची चर्चा सध्या सुरू आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीकडून रूपाली पाटील यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्याचे उलट पडसाद उमटले. आमदारांचे निधन होऊन काही दिवस झालेले असतानाच निवडणुकीची चर्चा सुरू केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

अखेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कोणत्याही पदाधिकाऱ्याने पोटनिवडणूक वक्तव्य करू नये अशा शब्दात कान टोचत या वादावर पडदा टाकला होता.

तसेच टिळक यांच्या शोकसभेमध्ये ही निवडणूक बिनविरोध करावी व तसेच टिळक कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.

कसबा मतदार संघ आणि चिंचवड मतदार संघात निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडूनही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी टिळक व जगताप कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

याबाबत भाजपने अद्याप भूमिका स्पष्ट केलेले नाही मात्र आता निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

पोटनिवडणुकीचे नोटिफिकेशन ३१ जानेवारी रोजी काढली जाणार असून ७ फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.

८ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. १० फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यानंतर २७ फेब्रुवारी मतदान होऊन २ मार्च रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT