Kasba Peth Bypoll Election  
पुणे

Kasba Bypoll Election : कसब्यासाठी भाजप 'मिशन मोड'वर; काँग्रेसनेही मागवले इच्छूकांचे अर्ज

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरून अद्याप प्रमुख काँग्रेस आणि भाजप पक्षाची उमेदवारी निश्चित झालेली नाही. मात्र दोन्ही पक्षांकडून इच्छूकांची यादी वाढत चालली आहेत. त्यातच भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली असून आज बैठकीचे आयोजन केले आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पुन्हा कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी बैठक घेणार आहेत. बैठकीला शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी सात वाजता कसबा मतदार संघातील आरसीएम हायस्कूल येथे ही बैठक होणार आहे. एकंदरीतच भाजप कोणतीही निवडणूक असो पूर्ण तयारीनेच मैदानात उतरतं. अर्थात कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप मिशन मोडवर आल्याचं दिसून येत आहे.

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपमधूनही दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक इच्छुक आहे. याशिवाय कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, भाजप खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे, माजी नगरसेवक अशोक येनपुरे यांचीही नाव चर्चेत आहेत.

दुसरीकडे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस देखील आजपासून इच्छुक उमेदवारांची यादी मागवणार आहे. आजपासून दोन दिवस इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात येणार आहे. तर ३ फेब्रुवारीला काँग्रेसचा उमेदवार घोषीत होणार आहे. काँग्रेसकडून कसबा निवडणूक लढण्यासाठी शहराध्यक्षांसह पाच जण इच्छुक आहेत. मात्र जो सक्षम उमेदवार असणार त्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

काँग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे यांची नावं चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT