रविंद्र धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही शिवसेनेतून झाली होती. काही काळ ते मनसेतहीदेखील होते.  
पुणे

Kasba Bypoll Election Result : रविंद्र धंगेकर ट्रेंडिंगमध्ये समाजमाध्यमांवर ‘पोस्ट’चा पाऊस; भाजपची कानउघडणी

रविंद्र धंगेकर ट्वीटरवर देशात टॉप ३० मध्ये ट्रेंडींगला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रांत नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि कसब्यात रविंद्र...., ‘धंगेकरां’चा दंग्यामुळे भाजपची रणनीती ‘रास’ नाही आली..., आता कळंल का धंगेकर कोण?.... या आणि अशा अनेक ‘पोस्ट’ने सकाळपासूनच कसब्याची विधानसभा निवडणूक आणि त्याही पेक्षा रविंद्र धंगेकर ट्रेंडिंगमध्ये होते. अगदी दूपारी तीन पर्यंत रविंद्र धंगेकर ट्वीटरवर देशात टॉप ३० मध्ये ट्रेंडींगला होते.

कसब्याच्या निवडणूक निकालांकडे जसे राजकारण्यांचे लक्ष लागले होते. तसे नेटकऱ्यांचेही लक्ष लागले होते. जस जसे निकालाचे कल समोर येत गेले, तस तसे व्हिडीओ मिम्स आणि ‘सल्ला’ देणारे पुणेरी टोमणे समाज माध्यमांवर व्यक्त होऊ लागले. महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकरांच्या विजयी मताधिक्याबरोबरच नेटकऱ्यांनी विश्लेषणाला सुरवात केली.

भाजप नेते चंद्रकांच पाटील यांचा ‘व्हू इज धंगेकर’ या प्रश्नावर... ‘आता कळालं का व्हू इज धंगेकर? फक्त घाम नाही, तर बालेकिल्ला फोडला’ अशा शब्दात उत्तर देण्यात आले. तर टिळक घराण्यातील उमेदवारी संदर्भात ‘टिळकांचा असंतोष आणि असंतोषाचे जनक’ असे मिम्सही दिवसभर फिरत आहे.

गृहीत धरु नका...

कसबा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला समजला जात असला, तरी मतदारांनागृहीत धरू नका असा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे. लोकांच्या रोजच्या जीवनातील समस्या सोडवायला हव्यात, नाहीतर मतदार तुम्हाला जागा दाखवेल, असा सल्लाही काही नेटकऱ्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : नागपुरात रक्ताचं नातं रक्ताळलं! भावानं 30 वर्षीय सख्ख्या बहिणीचा तलवारीनं चिरला गळा; मुलीच्या बचावासाठी गेलेली आईही गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ मार्च रोजी होण्याची शक्यता!

Satara News: पाचगणीत ‘ईडी’ची कारवाई! मनी लाँडरिंगप्रकरणी जुनैद मेमन यांच्या तीन मिळकती ताब्यात; गुप्तता अन् माहिती देण्यास टाळाटाळ!

Bribe Land Record Change : सातबाऱ्यावर फेरफार करण्यासाठी १० हजारांची लाच, महिला ग्राम महसूल अधिकारीचा भ्रष्ट कारभार उघड, दापोलीतील घटना

राज्यातील १२ झेडपी, १२५ पंचायत समितीच्या अध्यक्ष-सभापती निवडीचा 'मुहूर्त' ठरला; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

SCROLL FOR NEXT