kasba bypoll election seven lakh rs theft in kasba police pune crime
kasba bypoll election seven lakh rs theft in kasba police pune crime  esakal
पुणे

Pune Crime News : निवडणूक प्रचाराची धामधूम; कसब्यात सहा घरफोड्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचार सध्या शिगेला पोचला आहे. या भागात पोलिसांकडून वाहनांची तपासणी आणि चोख बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी सहा ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला. त्यापैकी दोन सदनिकांमधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज चोरी केल्याचे समोर आले आहे.

हा प्रकार २० फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारीच्या दरम्यान घडला. या संदर्भात सतीश मनोहर कामतकर (वय ५२, रा. शाळिग्राम प्रसाद अपार्टमेंट, बुधवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळिग्राम प्रसाद अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील कामतकर यांची सदनिका असून, ती बंद होती. चोरट्यांनी या सदनिकेचे कुलूप तोडून साडेसात तोळे सोन्याचे दागिने, चांदी आणि ३० हजार रुपयांची रोकड लांबवली.

तसेच, याच परिसरातील अन्य एका सदनिकेतून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा तीन लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. यासोबतच चोरट्यांनी इतर चार सदनिकांमध्येही घरफोडी करण्याचा प्रयत्न केला.

सध्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीमुळे प्रचाराची धामधूम सुरू आहे. पोलिसांचा बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत घरफोड्या झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT