kasba Bypoll Election Voting enthusiasm youth along with seniors politics pune
kasba Bypoll Election Voting enthusiasm youth along with seniors politics pune sakal
पुणे

kasba Bypoll Election : भल्या सकाळपासून ज्येष्ठांसह तरुणाईमध्ये मतदानाचा उत्साह

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भल्या सकाळी मतदारांचा उत्साह दिसून आला. ज्येष्ठ नागरिकांसह तरुणाईमध्ये मतदानाचा उत्साह होता. मुंबईहून भक्ती योगेश पिसाळे या गरोदर महिलेने येऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क दिला आहे, मतदान करणे आपले कर्तव्य आहे, निरपेक्षपणे मतदान करून लोकशाही टिकावा, असा सबुरीचा सल्ला ज्येष्ठ नागरिकांनी तरुणाईला दिला.

मागिल दोन दिवस मतदारसंघात रात्रीच्या वेळी पैसे वाटप आणि कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये उचलून नेल्यामुळे मतदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. तुम्ही बाहेर कितीही गुंडागर्दी करा, पण मतदान करताना नेमकेपणा आम्ही दाखवून देऊ असे म्हणत अनेकांनी बदलाचे वारे वाहत असल्याची प्रतिक्रिया दिली. एकट्या रविंद्र धंगेकरने भाजपाला घाम फोडल्याची चर्चेने जोर धरल्याचे पाहायला मिळाले.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर म्हणाल्या की, आचारसंहितेचा भंग करीत शनिवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेली पत्रके कार्यकर्त्यांनी वाटप करताना पोलिसांना दाखवून दिले.

आमच्या कार्यकर्त्यांचा काही गुन्हा नसताना पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्याच्या प्रकार किळसवाणा वाटला. मतदार गुप्त मतदानातून लोकशाही टिकविण्यासाठी योग्य निर्णय देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपचे उमेदवार हेमंत रासने म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघातील वाड्यांच्या प्रश्नासाठी टाऊन प्लॅनिंग केले आहे, ई-बसेसच्या माध्यमातून प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवित आहोत. मतदार सूज्ञ आहे, मतदारांचा उत्साह मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, भाजपने राष्ट्रीय स्तरावर विकासाच्या कामाचा झपाटा सुरू केला आहे. त्याच जोरावर कसबा आणि पिंपरी-चिंचवडमधील निवडणूक जिंकणार आहे. कोणतीही निवडणूक अटीतटीचीच असते. प्रत्येकाला जिंकायचे असते, त्यात वावगे काही नाही.

रामोशी गेट येथील सावित्रीबाई फुले शाळेमध्ये 22 बीएलओ कार्यरत होते. मतदानासाठी नेटकी व्यवस्था असल्याने मतदारांचा गोंधळ झाला नाही. 85 वर्षांचे योगेश शहा आणि त्यांच्या पत्नी तरला शहा (वय 68) म्हणाले, लोकशाही आहे, ती टिकली पाहिजे, त्यासाठी प्रत्येकाने सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान केले पाहिजे. तसेच सुशीलाबेन शहा (वय 70) लोकशाही बलशाली करण्यासाठी मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे.

अमृत अनिल सुगंध (वय 35, रा. तुळशीबाग), द्वारका अनिल धंगेकर (वय 55), माधव ताटळे (वय 75) आणि शिरीष आठल्ये (वय 72, नारायण पेठ) म्हणाले की, आतापर्यंत वाड्याच्या प्रश्नावर निवडणुका जिंकल्या मात्र काम काहीच केले नाही. पार्किंग, वाहतूककोंडीचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे आता मतदानातून बदलाचा संदेश दिला आहे.

ज्येष्ठ मराठी अभिनेता सुनील गोडबोले (वय वर्षे६८ ) हे सकाळी ७ ते ७:१५ वा. दरम्यान सदाशिव पेठ गोपाळ हायस्कूल येथे सपत्नी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. घटनेने आपल्याला अधिकारी दिला आहे. त्याप्रमाणे सर्वांनी मतदान करून हक्क बजावावा. असा संदेश त्यांनी मतदारांना दिला.

हार्ड कॉपी नसल्याने मतदानापासून वंचित-

मतदान करण्यासाठी अनेक पर्याय दिले होते. मतदान केंद्रावर मतदान कार्ड, मोबाईलमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड दाखविले. मात्र, ओरिजनल हार्ड कॉपी नसल्याने सनी खंडाळे आणि सुरेखा खंडाळे यांना मतदान करू दिले नाही. लोकशाहीची मूल्य जपण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र, लालफितीत अडकलेल्या सरकारी बाबूने मतदानापासून वंचित ठेवले. त्यामुळे लोकशाही आहे का नाही, अशी विचारणा त्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT