Kasba Ganapati and Tambadi Jogeshwari sakal
पुणे

Kasba Ganapati and Tambadi Jogeshwari : पुणे परिसर दर्शन : ग्रामदैवते अन् मंदिरांचे शहर

निजामाने या मंदिरास वर्षासन लावून दिल्याचा उल्लेख आहे. तो इ.स. १६१८ चा आहे. म्हणजेच आदिलशाही हल्ल्यामध्येसुद्धा या मूर्तीचे काही नुकसान झाले नव्हते.

सकाळ वृत्तसेवा

कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी ही दोन पुण्याची ग्रामदैवते. इ.स. १६३१ मध्ये आदिलशाही सैन्याने पुण्यावर हल्ला करून पुणे बेचिराख केले तरी काही कुटुंबे पुण्यात वास्तव्यास होती. त्यातीलच एक म्हणजे ठकार कुटुंब. या ठकार कुटुंबाच्या घराच्या आवारामध्ये एक गणेशाची स्वयंभू मूर्ती होती आणि ती पुजली जात होती.

यापूर्वी निजामाने या मंदिरास वर्षासन लावून दिल्याचा उल्लेख आहे. तो इ.स. १६१८ चा आहे. म्हणजेच आदिलशाही हल्ल्यामध्येसुद्धा या मूर्तीचे काही नुकसान झाले नव्हते. पुढे जेव्हा जिजाऊ साहेब आणि शिवाजी महाराज पुण्यात मुक्कामास येणार म्हणून त्यांच्यासाठी वाडा बांधायला घेतला त्या वेळी बेचिराख झालेले पुणे परत वसवण्याच्या उद्देशाने पुण्याची ग्रामदेवता पुणे वस्तीला साजेशी असावी म्हणून जिजाऊंनी कसबा गणपतीचे मंदिर बांधून घेतले.

तेव्हापासून कसबा गणपती मंदिर हे पुण्याचे ग्रामदैवत म्हणून पुजले जाते. तसेच पूर्वी आंबिल ओढा हा आताच्या बाजीराव रस्त्याच्या जागी होता आणि त्याच्या काठाला एका शेतामध्ये जोगेश्वरी देवीची चार हातांची एक स्वयंभू मूर्ती एका छोट्या घुमटीमध्ये पुजली जात होती. अशी ही दोन ग्रामदैवते पुण्यामध्ये पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. दोन्हीही मूर्ती कोणी घडविल्या हे माहीत नसल्याने त्यांना स्वयंभू मूर्ती असे म्हटले जाते.

पेशव्यांचे कुलदैवत हे कोकणामध्ये असलेली योगेश्वरी देवी हे होते, परंतु पुण्यास वास्तव्यास आल्यावर इथेच असलेली जोगेश्वरी देवी ही त्यांनी आपली कुलदेवता मानून त्यांनी त्या देवीचे मंदिर बांधले. तेव्हापासून कसबा गणपती आणि जोगेश्वरी यांचे दर्शन घेऊनच पेशवे आणि इतर सरदार हे वेगवेगळ्या स्वाऱ्यांना बाहेर पडत असत. जोगेश्वरी देवीची पूजाअर्चा आणि मंदिराची राखण ही बेंद्रे घराण्याकडे, तसेच कसबा गणपतीची ठकार घराण्याकडे अजूनपर्यंत आहे.

काय पहाल

कसबा गणपती : जुने मंदिर लाकडी खांब व वासे वापरून केलेला सभामंडप, दगडी शिखर, मंदिराजवळच्या भिंतीवर गणेशाच्या कथा चित्रित स्वरूपात.

जोगेश्वरी देवी : हे पंचायतन मंदिर आहे. पंचायतन म्हणजे पाच देवांचे मंदिर. मुख्य मंदिर आणि चार कोपऱ्यांत चार इतर देवता. मुख्य मंदिरातील देवतेच्या नावाने मंदिर ओळखले जाते. जोगेश्वरी मंदिरात मुख्य जोगेश्वरी देवीबरोबरच महादेव, गणपती, विष्णू आणि हनुमान अशी चार मंदिरे आहेत.

कसे पोहचाल

कसबा पेठेत जोगेश्वरी देवी आणि कसबा गणपती मंदिर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Sangli DCC Bank : नातेवाइकांना कोट्यवधींची कर्जमाफी? नाबार्डच्या तपासणीत मोठा खुलासा, सांगली जिल्हा बँक अडचणीत, आमदार पडळकरांचा संचालकांवर गंभीर आरोप

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमा व्रताच्या कथेचं पुस्तक नाहीये? मग व्रत परिपूर्ण करण्यासाठी वाचा सत्यवान-सावित्रीची कथा ऑनलाइन

IND vs IRE, T20I: 'अन् तिथेच आम्ही कमी पडलो', कर्णधार श्रेयस अय्यरने व्हाईटवॉशनंतर दिली कबुली

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गोड बातमी! सोन्याचे भाव पुन्हा घसरले; आज 10 ग्रॅमचा भाव किती?

SCROLL FOR NEXT