Kasba Peth Bypoll Election  
पुणे

Kasba Peth Bypoll : भाजपला गरज पडायची तेव्हा… ; कसब्यातील उमेदवारीबाबत काँग्रेसची मोठी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

Kasaba Peth By election 2023 : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना फोन केला होता.

मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्या काँग्रेसकडून कसबा पेठ विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांनी या निर्णयामागीतल पक्षाची भूमिका देखील जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून ही निवडणूक बिनविरोध केली जावी याकरिता आलेल्या फोनबद्दल बोलतना पटोले म्हणाले की, त्यांना आपण यावर बसून चर्चा करू असे सांगितलं. मात्र काल भाजपकडून या निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली, ती टिळक परिवाराला देण्यात आली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दिला होता तो जो प्रस्तावाला आता अर्थ राहिला नाही, असं पटोले म्हणाले.

पटोले पुढे म्हणाले की, मुक्ता टिळक जेव्हा आजारी होत्या तेव्हा विधानसभेत भाजपला जेव्हा गरज पडायची तेव्हा त्यांना स्ट्रेचरवर उचलून आणलं जायचं.त्यांनी शेवटपर्यंत भाजपसाठी काम केलं. त्यांच्या कुटुंबाला तिकीट मिळेल असं वाटतं होतं. ते मिळालं नाही. हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, असेही पटोले म्हणाले.

उद्या अर्ज भरणार..

पटोले पुढे बोलताना म्हणाले, उद्या आम्ही आमच्या उमेदवारांचा अर्ज भरणार आहोत. दुसरं अदानी कंपनी बँका एलआयसीच्या माध्यमातून खोटे कागद दाखवून कर्ज घेतलं. याबद्दल लोकसभेत चर्चा व्हावी अशी मागणी केली जातेय. जॉइंट पार्लमेंट कमिटी स्थापन करण्याची मागणी कॉंग्रेसकडून केली जातेय. याला भाजप विरोध करतेय म्हणून देशभरात कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे असे नाना पटोले म्हणाले.

या आंदोलनात सुशिल कुमार शिंदे, पृथ्वीराज चौहान, अशोक चव्हाण या आंदोलनात उपस्थित राहाणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT